पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ट्विटरकडून ग्राहकांसाठी नवी सुविधा; फेसबुक, इन्स्टाच्या पावलावर पाऊल

प्रातिनिधिक छायाचित्र

फेसबुक, इन्स्टाग्रामनंतर आता मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरनेही लाईव्ह स्ट्रिमिंग व्हिडिओमध्ये पाहुण्यांना सहभागी करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून लाईव्ह व्हिडिओ करताना जास्तीत जास्त तीन पाहुण्यांना त्यामध्ये सहभागी करून घेता येणार आहे. ट्विटरच्या आयओएस आणि एँड्राईड अ‍ॅपवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे EnGadget  म्हटले आहे. आयएएनएसने या संदर्भातील वृत्त दिले आहे. 

लाईव्हच्या माध्यमातून एकट्यानेच बोलण्यापेक्षा तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही त्यामध्ये सहभागी करून घ्या. त्यांच्यासोबत लाईव्ह जा, असे ट्विटरने म्हटले आहे. फेब्रुवारीमध्ये ट्विटरने हे फिचर पेरिस्कोपवर उपलब्ध करून दिले होते. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हे फिचर आता ट्विटरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. लोकांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हे फिचर उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर आपले मत मांडण्यासाठीचे ते पुढचे पाऊल असेल. 

अ‍ॅपलनं लाँच केला iPod, जाणून घ्या किंमत

आतापर्यंत लाईव्ह स्ट्रिमिंगचे फिचर फेसबुक, इन्स्टाग्रामवर उपलब्ध होते. ते आता ट्विटरवरही उपलब्ध झाले आहे.