पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लहान मुलांची गोठवण्यात आलेली ट्विटर अकाऊंट पुन्हा होणार सुरू

ट्विटर

ट्विटरनं गेल्या वर्षी लहान मुलांची ट्विटर अकाऊंट  गोठवली होती. हे युजर्स अल्पवयीन असल्याचं लक्षात आल्यानंतर गेल्यावर्षी  ट्विटरनं लहान मूलं हाताळत असलेली ट्विटर अकाऊंट गोठवण्याचा निर्णय घेतला होता. २५ मे २०१८ मध्ये १३ वर्षांखालील सर्व  मुलांची ट्विटर अकाऊंट गोठवली होती. मात्र ती खाती आता त्यांना पुन्हा सुरू करता येणार आहे. ट्विटरची वयाची अट पूर्ण झाल्यानंतर  युजर्सनां त्यांचं बंद करण्यात आलेलं ट्विटर अकाऊंट सुरू करता येणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. 

ट्विटर युजरची किमान वयोमर्यादा ही  कायद्याप्रमाणे १३ ठेवण्यात आली होती. मात्र अनेक ट्विटर युजर्सचं वय हे १३ वर्षांपेक्षाही कमी असल्याचं लक्षात आल्यानंतर कंपनीनं त्यांची ट्विटर अकाऊंट गोठवली होती. आता  कंपनीनं  नवा निर्णय घेतला आहे. ज्या ट्विटर युजरचं वय हे  १३ वर्षांहून अधिक झालं  असेन त्यांना आपलं जुनं अकाऊंट पुन्हा सुरू करता येणार  असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. 

वयाची अट पूर्ण  झालेल्या ट्विटर युजर्सनां कंपनीकडून येत्या काही दिवसांत मेल येणार आहे. या मेलनंतर युजर्सनां त्यांचं जुनं  खातं पुन्हा वापरता येणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. या मेलमध्ये ट्विटर अकाऊंट पुन्हा कसं सुरू करायचं यासंबधीची माहिती देण्यात येणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. ज्यांनी वयाची अट पूर्ण केली आहे मात्र त्यांना कंपनीकडून अधिकृत मेल आली नसेन त्या युजर्सनां देखील सोप्या प्रक्रिया वापरून अकाऊंट  सुरू करता येणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Twitter giving locked users their accounts back Twitter had locked down accounts owing to age restriction