पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सतत उत्साही आणि प्रफुल्लित राहण्यासाठी ट्विटरचे CEO काय करतात माहितीये?

जॅक डोर्से

आठवड्यातून फक्त सात वेळाच आपण हलकं जेवतो. ते सुद्धा संध्याकाळच्या वेळी, असे ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक डोर्से यांनी एका युट्यूब मुलाखतीमध्ये सांगितले. आपल्या हटके जीवनशैलीबद्दल त्यांनी या मुलाखतीमध्ये माहिती दिली. त्यांच्या जीवनशैलीमध्ये बर्फाइतक्या थंडगार पाण्याने आंघोळ (आईस बाथ) याचाही समावेश आहे. 

महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्याच्या खर्चाचा आकडा आला समोर

जॅक यांच्या जीवनशैलीमध्ये विपश्यना आणि अत्यंत कमी अन्न ग्रहण करणे या दोन गोष्टींना प्राधान्य असते. रोज कोणते पदार्थ खायचे याची यादीच त्यांनी तयार करून ठेवली आहे. यामध्ये मासे, चिकन आणि खूप साऱ्या हिरव्या भाज्या यांचा समावेश आहे. रोज दोन तास विपश्यना करणे हा सुद्धा त्यांच्या जीवनशैलीचाच भाग आहे. रोज आईस बाथ करणे शक्य नसले तरी आठवड्यात शक्य असेल त्यावेळी मी याला प्राधान्य देतो, असे जॅक यांनी सांगितले.

वांद्र्यातही 'लंडन आय', 'मुंबई आय'मधून घडणार 'मुंबापुरी'चे दर्शन

आपल्या जीवनशैलीमध्ये विटॅमिन सीला जास्त प्राधान्य आहे. सकाळच्या वेळी बर्फाइतक्या थंड पाण्याने आंघोळ केल्याचा आपल्याला खूप फायदा होता, असे जॅक यांनी सांगितले.