पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सारा अली खान, निळा कुर्ता आणि सोशल मीडिया!

सारा अली खान

निळ्या रंगाच्या कुर्त्यामुळे अभिनेत्री सारा अली खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पारंपरिक पद्धतीचा पेहराव असू दे की आधुनिक पद्धतीचा. सारा अली खानचे सौंदर्य दोन्ही प्रकारच्या कपड्यांमध्ये उठून दिसते. चित्रपटातील अभिनयाबद्दल अनेकांनी साराचे कौतुक केले आहे. पण आता तिच्या कपडे घालण्याच्या अंदाजावरूनही सोशल मीडियात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. त्यातही निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये सारा अली खान खूपच सुरेख दिसते. 

सारा अली खानचा जीममध्ये घालण्यात येणाऱ्या कपड्यातील एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात आला होता. त्यातही ती सुरेख दिसत असल्याचे पाहायला मिळाले होते. शक्यता सारा जे कपडे घालते, त्यामध्ये ती अगदी सहजपणे वावरताना दिसते. त्याचबरोबर तिचा अंदाजही इतरांपेक्षा वेगळा असतो. अत्यंत साध्या पद्धतीने स्वतःला सगळ्यांसमोर घेऊन जाण्याला सारा प्राधान्य देते. त्यामुळेच तिच्या प्रत्येक नव्या लूकची कायमच चर्चा होत असते. सध्या चर्चेत असलेल्या तिच्या निळ्या रंगाच्या कुर्त्यातील फोटोमध्ये ती खूप स्टायलिश दिसते आहे. वेगवेगळ्या ठिकाणी निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्येच ती दिसते. त्यामुळेही ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. साराचा हटके अंदाज महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींकडूनही फॉलो केला जातो. त्यामुळे त्यांच्यामध्येही याची चर्चा असते.

डिझायनर ओव्हरसाईज कुर्त्यामध्ये सारा
डिझायनर ओव्हरसाईज कुर्ता आणि खाली जीन अशा पेहरावात सारा दिसली होती. या ड्रेसवर तिने पांढऱ्या रंगाचे कानातलेही घातलेले दिसताहेत.

सारा अली खान

ब्लू पेप्लम टॉप आणि धोती सलवार
डिझायनर ब्लू पेप्लम टॉप आणि धोती सलवार अशा एकदम कूल अंदाजात साराला बघितल्यावर सगळ्यांनाच तिचा तो पेहराव आवडला.

सारा अली खान

फ्रॉक स्टाईल कुर्ती आणि सारा
सारासारखी फ्रॉक स्टाईल कुर्ती तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. ज्यासोबत प्लाजो किंवा ट्राऊजरही खूप सुरेख दिसतो.

सारा अली खान