पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... अखेर गुगल, ऍपलने ऍप स्टोअरमधून टॉक टॉक ऍप काढून टाकले!

मोबाईलमधील ऍप. (प्रातिनिधिक छायाचित्र)

ऍपच्या माध्यमातून वापरकर्त्यांची हेरगिरी केल्याचे आरोप झाल्यावर ऍपल आणि गुगल या दोन्ही कंपन्यांनी आपल्या ऍप स्टोअरवरून टॉक टॉक ऍप काढून टाकले आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, संयुक्त अरब अमिराती सरकारकडून लोकांमधील संभाषण, त्यांची माहिती, फोटो, त्यांच्यातील नातेसंबंध याची माहिती मिळवण्यासाठी या ऍपचा वापर केला जात होता.

CAA: राहुल आणि प्रियांका गांधींना मेरठ शहराबाहेर पोलिसांनी अडवले

टॉक टॉक हे ऍप काही दिवसांपूर्वीच बाजारात आले होते. पण आल्यानंतर अल्पावधीत ते मोबाईल वापरकर्त्यांमध्ये प्रसिद्ध झाले. युरोप, आशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिका या भागांमध्ये अनेकांनी या ऍपला प्रतिसाद दिला. लाखो लोकांनी हे ऍप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड केले. गेल्या आठवड्यात अमेरिकेत सर्वाधिक डाऊनलोड झालेले ऍप म्हणून टॉक टॉक चर्चेत आले होते. 

मोदी की शहा, कोण खरं बोलत आहे?, ओवेसींचा सवाल

वेगवान संदेशवहन आणि कॉल करण्यासाठी उपयुक्त ऍप म्हणून टॉक टॉककडून स्वतःची प्रसिद्धी करण्यात येत होती. या ऍपकडून त्यांचे एन्क्रिप्शन प्रोटोकॉल कसे आहे, याची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. उदा. व्हॉट्सऍपकडून एंड टू एंड एन्क्रिप्शन वापरले जाते. ज्यामुळे दोघांमधील संवाद इतर कोणाला दिसत नाही, याची खात्री असते. संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्काईप आणि व्हॉट्सऍपवर बंदी आहे. त्यामुळे तिथे टॉक टॉक ऍप खूप प्रसिद्ध झाले आहे.