पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टिक-टॉक स्मार्टफोन येणार, कंपनीनं दिला वृत्ताला दुजोरा

टिकटॉक

चायनिज सोशल मीडिया कंपनी बाईट डान्स लवकरच स्मार्टफोन लाँच करणार आहे. स्मार्टफोनवर काम सुरू असल्याच्या वृत्ताला  बाईट डान्स लिमिटेडनं दुजोरा दिला आहे.  चीनमधील प्रसिद्ध डिव्हाइस मेकर कंपनी स्मार्टीसॅन टेक्नॉलिजीसोबत मिळून हा फोन तयार करण्यात येणार आहे. व्हिडीओ आणि अॅप निर्मिती क्षेत्राच्या पलिकडे जाऊन हा फोन तयार करण्यात येणार आहे.

नोकिया आणणार पॉप-अप सेल्फी कॅमेरा फोन

स्मार्टीसॅनच्या जुन्या ग्राहकांना अधिक चांगली सेवा पुरवण्यासाठी यावर काम सुरू आहे. गेल्या सात महिन्यांपासून यावर काम सुरू आहे. काही  महिन्यांपूर्वी स्मार्टीसॅनमधून काही कर्मचाऱ्यांना बाईट डान्समध्ये हलविण्यात आले होते. हा फोन केवळ चिनी ग्राहकांसाठीच लाँच करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

अ‍ॅपलचा iPhone ११ येतोय, फोटो आणि फीचर लीक

बाईट डान्सही टिक-टॉकची पॅरेंट कंपनी आहे. कंपनी खूप आधीपासून स्मार्टफोनच्या बाजारात उतरण्याचा विचार करत  होती. या  फोनमध्ये टिकटॉक आणि कंपनीच्या इतर अ‍ॅपचा समावेश प्रामुख्यानं असणार आहे.