पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टिकटॉकच्या निर्माता कंपनीने आणला नवा स्मार्टफोन, पाहा फिचर्स

Jianguo Pro 3 नवा स्मार्टफोन

टिकटॉकची निर्माता कंपनी बाईटडान्सने आता आपला स्वतःचा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. सध्या हा मोबाईल फक्त चीनमध्ये विक्रीला उपलब्ध आहे. Jianguo Pro 3 असे या मोबाईलचे नाव आहे. या मोबाईलमध्ये टिकटॉकसाठी काही खास सुविधा देण्यात आल्या आहेत. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेज असलेल्या फोनची भारतीय रकमेनुसार किंमत २९२०० रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज असलेल्या मोबाईलची किंमत ३२१०० रुपये आहे.

रजनीकांत यांना सरकार आयकॉन अवॉर्डने सन्मानित करणार

ऍबॅकसने दिलेल्या वृत्तानुसार, या मोबाईलमध्ये ग्राहकांना पासकोडशिवाय टिकटॉक वापरता येईल. टिकटॉक सुरू करण्यासाठी ग्राहकांना फक्त आपल्या मोबाईलवरील स्क्रिनवर स्वाईपअप करावे लागेल. टिकटॉकचे स्पेशल इफेक्टसही ग्राहकांना या मोबाईलवर वापरता येतील.

Jianguo Pro 3 मोबाईलमध्ये ६.३९ इंचाचा पूर्णपणे एचडी आणि अमोलेड स्क्रिन देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८५५+ प्रोसेसर यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर ४००० एमएएच बॅटरीही असणार आहे. फोटो काढण्यासाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलची वाईड एँगल तर ८ मेगापिक्सलची टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सत्ता स्थापण्यासाठी भाजप-शिवसेना एकत्र येतीलः शरद पवार

एँड्राईड स्मार्टिसन ऑपरेटिंग सिस्टिम ७ वर हा फोन चालणार आहे. यामध्ये ४ जी एलटीई, ब्लूटूथ ५.० ही देण्यात आले आहे.