पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टिक-टॉकवर करता येणार खरेदी-विक्री

टिकटॉक

तरुणांमध्ये त्यातूनही भारतात विशेष लोकप्रिय ठरलेल्या टिक-टॉकवर येणाऱ्या काळात खरेदी विक्रीही  करता येणार आहे.  शॉर्ट व्हिडिओ शेअररिंग अ‍ॅप असलेले  टिक-टॉक नवीन फीचरची चाचणी करत आहे. या फीचरमुळे क्रिएटरला इ- कॉमर्स साइटची लिंक पोस्ट करता येणार आहे. काही रिपोर्टनुसार व्हिडिओद्वारे जाहिरात केलेल्या  वस्तूंचीही खरेदी व्ह्यूवर्सनां करता येणार आहे.  

टिकटॉकच्या निर्माता कंपनीने आणला नवा स्मार्टफोन, पाहा फिचर्स

क्रिएटरनं केलेली पोस्ट स्वाइप केल्यानंतर युजर्स इ- कॉमर्ससाइटवर पोहतो. तिथे त्यांना  खरेदी विक्री करता येईल. 

तर दुसरीकडे टिकटॉकची निर्माता कंपनी बाईटडान्सने स्वतःचा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. सध्या हा मोबाईल फक्त चीनमध्ये विक्रीला उपलब्ध आहे. Jianguo Pro 3 असे या मोबाईलचे नाव आहे. या मोबाईलमध्ये टिकटॉकसाठी काही खास सुविधा देण्यात आल्या आहेत. 

..म्हणून इन्स्टाग्राम एकूण ‘likes’चा आकडाच टाकणार काढून