पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हे नैसर्गिक उपाय दूर करतील कोंड्याची समस्या

हे नैसर्गिक उपाय  दूर करतील कोंड्याची समस्या

हिवाळ्यात त्वचा, केस रुक्ष होतात.  केसांमध्ये कोंड्याची समस्या अधिक उद्भवते. अशा वेळी घरगुती उपचारांमुळे ही समस्या दूर होऊ शकते. या उपयांमुळे कोंडाही दूर होतो आणि केसही अधिक  मजबूत होतात. हे उपाय कोणते  ते पाहू

मीठ किती खावे?

 कोरफड 
कोरफड ही त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी नेहमीच गुणकारी मानली जाते. त्यामुळे तुम्ही कोंड्याच्या समस्येनं त्रासला असाल तर कोरफडीचा गर केसांच्या मुळांना लावा. काही वेळानंतर  केस धुवून टाका. 

दही 
दही हे केसांच्या मुळांना  लावा आणि काही वेळानं केसं धुवून टाका. दहीमुळे कोंड्याची समस्याही दूर होते आणि केस मऊ देखील होतात. 

आवळा करतो मुरमाचे डाग दूर

खोबरेल तेल 
खोबरेल तेल हे कोंड्याच्या समस्येपासून लढण्यासाठी अधिक परिणामकारक आहे. केस धुण्याआधी खोबरेल तेल  केसांच्या मुळांना लावून हकला मसाज करा. खोबरेल तेल कोमट करुनही तुम्ही ते केसांना लावू शकता. याच्या नियमीत वापरानं कोंड्याची समस्या दूर होते.