पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केसांसाठी सौंदर्यप्रसाधनांऐवजी हे नैसर्गिक घटक वापरून पाहा

केसांचे आरोग्य

प्रदूषण, सौंदर्य प्रसाधन, ड्रायर, स्टाइलिंग मशिन्स यांसारख्या  गोष्टींचा सतत वापर केल्यामुळे  केस रुक्ष होतात.  केसांना योग्य ते पोषण  न मिळाल्यानं केस गळतात किंवा स्प्लिट एंडची समस्याही  मोठ्या प्रमाणात जाणवते. या समस्येवर उपाय म्हणून रसायनं असलेल्या आणखी  उत्पादनांचा मारा आपण करतो. मात्र  केमिकल्स असलेली सौंदर्य प्रसाधनं वापरण्यापेक्षा आपण घरच्या घरी नैसर्गिक घटक वापरून केसांचं आरोग्य सुधारू शकतो.

- कोरफड ही रुक्ष केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. कोरफडीचा गर काढून तो केसांना लावल्यास केस मऊ होतात शिवाय कोंड्याची समस्याही दूर होते. म्हणूनच आठवड्यातून एकदा रुक्ष केसांसाठी कोरफड  नक्की वापरून पाहा.
- दही देखील केस मऊ ठेवण्यास मदत करते. केसांचा रुक्षपणा घालवण्यासाठी दही फायदेशीर आहे. आजूबाजूच्या प्रदूषणामुळे केस रुक्ष होतात तेव्हा केसांना दोन आठवड्यातून एकदा दही लावावी.

अंड

- अंड हे देखील केसांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. अंड्यातील प्रोटीन्समुळे केस मजबूत होतात, केसांना प्रदूषण, स्टाइलिंग मिशिन्सच्या  उष्णतेमुळे पोहोचलेली हानी अंड भरून काढतं. म्हणून अंड्याचा सफेद भाग केसांसाठी वापरावा हे नैसर्गिक कंडिशनरसारखं काम करतं.
­ - त्याचप्रमाणे केसांसाठी खोबऱ्याचं तेलही फायदेशीर आहे.  खोबऱ्याचं तेल केसांच्या मजबूतीसाठी उत्तम आहे. 
- या नैसर्गिक घटकांबरोबरच केसांवर ड्रायर किंवा स्टाइलिंग मशिन्सचा वापर कमी करावा. मशिन्समध्ये असलेल्या उष्णतेमुळे केस रुक्ष होतात आणि केसांना नुकसान  पोहचतं.