पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

iOS 13 येणार; पण आयफोन ६, ६ प्लस त्यातून वगळण्याची शक्यता

आयफोन

अ‍ॅपलकडून आणण्यात येणाऱ्या नव्या आयओएस १३ या अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टिमची सध्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी चर्चा सुरू आहे. पण याच संदर्भात एक धक्कादायक माहिती हाती आली आहे. आयओएस १३ ही नवी ऑपरेटिंग सिस्टिम आयफोन ६, आयफोन ६ प्लस, आयफोन एसई आणि त्या आधीच्या आयफोनवर चालणार नाहीत, अशी माहिती समजते आहे. त्याचबरोबर आयओएस १२ या ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर आयपॅड मिनी २ आणि आयपॅड एअर या दोन्हींनाही करता येणार नाही.

आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस या दोन्ही मोबाईल हँडसेटना नव्या ऑपरेटिंग सिस्टिमच्या बाहेर ठेवणे यावरून आयफोनच्या भारतातील वापरकर्त्यांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे. अनेकांकडून आयफोन ६ आणि ६ प्लस या आयफोनचा वापर केला जातो. आजही भारतीय बाजारात अ‍ॅपलच्या आयफोन ६ प्लसची विक्री सुरू आहे. त्याचबरोबर आयफोन एसई सुद्धा अनेक ठिकाणी विक्रीला उपलब्ध आहे. असे असताना आयओएस १३ च्या कक्षेतून यांना वगळण्यात येणार असल्यामुळे हे फोन बाद ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Apple iPhone X च्या किमतीत मोठी सूट जाणून घ्या किंमत

अ‍ॅपलकडून दरवर्षी आयओएसचे नवे व्हर्जन आणले जाते. ज्यामध्ये वेगवेगळ्या फिचर्सचा समावेश केलेला असतो. पण आयओएसच्या नव्या व्हर्जननंतर अ‍ॅपलचे जुने फोन मंदावतात अशी तक्रार कायम केली जाते. त्यामुळे गेल्या वर्षी आयओएस १२ आणण्यात आल्यानंतर त्याच्या कक्षेत आयफोन ५ एस आणि त्यापुढील सर्व आयफोनना घेण्यात आले होते. यावरूनही गेल्यावर्षी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी चर्चा झाली होती.

जुने आयफोन वापरणाऱ्यांनी नवे आयफोन घ्यावेत, यासाठीच जुन्या आयफोनना आयओएस १३ च्या कक्षेबाहेर ठेवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. २०१७ पासून आयफोनने तीन नवे आयफोन बाजारात आणले आहेत. २०१९ मध्येही कंपनीकडून नवा आयफोन बाजारात आणला जाणार असल्याची चर्चा आहे.