पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक! भोपळा खा निरोगी रहा

भोपळा खा निरोगी रहा!

गोल गरगरीत लाल भोपळ्यात बसून 'चल रे भोपळ्या टुणुक टुणुक' म्हणणाऱ्या म्हातारीची गोष्ट तुम्ही सर्वांनी लहानपणी ऐकली असेलच किंवा भोपळ्याच्या आलिशान गाडीत बसून राजकुमाराला  भेटायला जाणाऱ्या सिंड्रेलाचीही गोष्टही तुम्हाला परिचयाची असेल मात्र या परिकथांपलिकडे भोपळ्याला आपण आपल्या आहारात विशेष महत्त्व देत नाही.  उलट 'ए भोपळ्या'  असं आपण किती उपरोधिकपणे म्हणतो पण तुम्हाला माहितीये फळभाज्यांमध्ये लाल भोपळा ही एक अतिशय टिकाऊ, सर्वांत स्वस्त आणि बीटा कॅरोटिनचा पुरवठा करणारी उत्तम फळभाजी आहे. 

ट्रम्पच्या मुलीची २० वर्षे जुन्या स्टाइलला पसंती

- भोपळ्यात अ, क आणि ई जीवनसत्त्व असून बी कॉम्प्लेक्स आणि फॉलेट भरपूर प्रमाणात असतं.  त्यामुळे अनेक रोगांपासून लढण्याकरता या भाजीचा खूप फायदा होतो. 
- लाल भोपळ्यात असलेल्या अ आणि  बीटा कॅरोटिनमुळे डोळ्याचं आरोग्य चांगलं राहातं. त्यामुळे जेवणात भोपळ्याचा सहभाग आवर्जून करावा.
-  भोपळ्याच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचप्रमाणे संसर्गापासून लढण्यासाठी भोपळ्यात असलेले जीवनसत्त्व शरीरास मदत करतात. 
- भोपळ्याच्या बियांमध्येही प्रथिनं, खनिजं आणि जीवनसत्त्वांचा भरपूर साठा आहे. या बियांमध्ये असलेली खनिजे मधुमेहांच्या रुग्णासाठी अधिक फायदेशीर असतात. रक्तातील शर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी या बिया फायदेशीर आहेत असं संशोधनातून समोर आलं आहे. 

इन्स्टाग्राम, फेसबुकमुळे ब्रेकअपचा त्रास होतो सर्वाधिक !