पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पालक मर्यादेपलीकडे माहिती शेअर करत असल्याचा मुलांचा आरोप

प्रातिनिधिक छायाचित्र

सोशल मीडियावर तरुण पीढीच नाही तर त्यांचे पालक देखील बऱ्यापैकी सक्रीय असतात. मात्र पालक आपल्या मुलांचीही अतिरिक्त माहिती सोशल मीडियावर शेअर करतात असं ४२% मुलांना वाटतं. 

सणासुदीसाठी घराचा मेकओव्हर करण्यासाठी पाच सोप्या टीप्स

मायक्रोसॉफ्टनं केलेल्या सर्वेक्षणात भारतासह जगभरातील २५ देशांमधील मुलांचं मत विचारात घेण्यात आलं होतं. या सर्वेक्षणातून सोशल मीडियावर सक्रीय असलेले पालक आपल्या मुलांची अतिरिक्त माहिती शेअर करत असल्याचं समोर आलं आहे. १३ ते १७ वयोगटातील अल्पवयीन मुलांनी यात सहभाग घेतला होता. पालक मुलांबद्दल अतिरिक्त माहिती सोशल मीडियावर शेअर करतात ही गंभीर बाब असल्याचं ११ टक्के मुलांना वाटतं. तर १४ टक्के मुलांना याबाबत फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचं वाटतं. 

इन्स्टाग्राम आपलं एक फीचर करणार रद्द

मायक्रोसॉफ्टनं फ्रान्स, जर्मनी, सिंगापूर, तुर्की, नेदरलँड, मलेशिया, भारत यांसारख्या अनेक देशांतील मुलांवर सर्वेक्षण केलं. यातून ही माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणात १२ हजारांहून अधिक अल्पवयीन मुलांनी सहभाग घेतला होता.