पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बंगळुरूतील कंपनीने तयार केले स्वस्तातले व्हेंटिलेटर्स, विजेची गरजच नाही

विजेशिवाय चालणारे आणि स्वस्त किंमतीचे व्हेंटिलेटर्स या कंपनीने तयार केले आहेत. ज्याचा कोविडग्रस्त रु

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे व्हेंटिलेटर्स तयार करण्यामध्ये बंगळुरूमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील एका कंपनीने महत्त्वाचे काम केले आहे. विजेशिवाय चालणारे आणि स्वस्त किंमतीचे व्हेंटिलेटर्स या कंपनीने तयार केले आहेत. ज्याचा कोविडग्रस्त रुग्णांना उपयोग होऊ शकतो.

मुंबई, पुणे, जयपूर, कोलकातामध्ये कोरोनाची स्थिती गंभीर: गृह मंत्रालय

बंगळुरूस्थित डायनामॅटिक टेक कंपनीने हे व्हेंटिलेटर्स तयार केले आहेत. त्याची किंमत प्रति व्हेंटिलेटर २५०० रुपये ठेवण्यात आली आहे. वास्तविक ही तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ऑटोमोटिव्ह, एअरोनॉटिक आणि सुरक्षा या क्षेत्रांशी संबंधित उच्च तंत्रज्ञानाच्या उपकरणांची निर्मिती करते. पण या कंपनीने देशापुढील आव्हान ओळखून नवे व्हेंटिलेटर्स तयार केले आहेत. 

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून या नव्या उत्पादनाबद्दल कंपनीचे कौतुक केले. त्यांनी म्हटले आहे की, हे नवे उत्पादन ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वरदानच आहे. छोट्या रुग्णालयांसाठीही हे उत्पादन उपयुक्त ठरणार आहे. अनेकांचे जीव वाचविण्यासाठी याचा उपयोग होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

गोवापाठोपाठ मणिपूर कोरोना मुक्त, राज्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

या नव्या व्हेंटिलेटरसाठी विजेची अजिबात गरज नाही. कोणत्याही घटकाचे आयात करण्याची गरज नाही. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक घटकाचीही यासाठी गरज नाही. या व्हेंटिलेटरमध्ये कमाल आणि किमान दाब नियंत्रित करता येतो. ऑक्सिजनचा पुरवठा योग्य पद्धतीने करता येतो, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.