पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उकडलेले मक्याचे दाणे खरंच आरोग्यासाठी चांगले आहेत का?

स्वीट कॉर्न

पिवळे - सोनेरी टपोरे मक्याचे गोडसर दाणे, त्यावर चटपटीत चाट मसाला आणि भरपूर बटर हे  खाणं सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. या गोडसर मक्यांच्या दाण्यांचा सकाळच्या न्याहरीत आवर्जून सहभाग असतो. इतकंच कशाला चित्रपटगृहात किंवा अगदी स्ट्रीटफूडमध्येही या स्वीट कॉर्ननं जागा मिळवली आहे. अनेकांना हे यलो स्वीट कॉर्न 'हेल्दी' वाटतात. पण हे खरंच हेल्थी आहेत का? चला तर जाणून घेऊ.

सतत उत्साही आणि प्रफुल्लित राहण्यासाठी ट्विटरचे CEO काय करतात माहितीये?

विक्रीसाठी येणारे ९० %  स्वीट कॉर्नचं पीक हे नैसर्गिक पद्धतीनं घेतलं जात नाही. त्यामुळे  बहुतांश यलो स्वीट कॉर्न हे (Genetically Modified Organism) मध्ये मोडतात. अशा पद्धतीनं उत्पन्न घेतलेल्या  यलो स्वीट कॉर्नचा तसाही शरीरास काहीच फायदा नसतो.  याउलट हे खाल्ल्यानं वजन वाढणं किंवा पोट फुगण्याच्या समस्या अधिक उद्भवतात.

 

गगनयान मोहिमेतील भारतीय अंतराळवीरांच्या अवकाशातील जेवणात हे खास पदार्थ

उलट भारतीय व्हाइट कॉर्न म्हणजेच पांढऱ्या मक्याचे दाणे हे आरोग्यास अधिक फायदेशीर असतात. नैसर्गिक पद्धतीनं यांची शेती केली जाते. त्यामुळे हे व्हाइट कॉर्न खाणं आरोग्यासाठी कधीही फायदेशी आहे कारण यात शर्करेचं प्रमाण योग्य असते त्याचप्रमाणे फायबरही अधिक असतं.