पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पगारापेक्षा आजच्या पिढीला हवीये नोकरीत स्थिरता

पगारापेक्षा आजच्या पिढीला हवीय नोकरीत स्थिरता

आजच्या पिढीला नोकरीत स्थिरता ही पगारापेक्षा अधिक महत्त्वाची  आहे असं नुकतंच एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. बँकिंग आणि सरकारी नोकरीत काम करण्याची इच्छा असलेल्या देशभरातील ५००० तरुणांचा ऑलिव्ह बोर्डकडून घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात समावेश होता. 

पालक मर्यादेपलीकडे माहिती शेअर करत असल्याचा मुलांचा आरोप

४४.३% टक्के  तरुणांना नोकरीतील स्थिरता अधिक म्हत्त्वाची वाटते, तर  ३६.७ टक्के तरुणांना नोकरीच्या ठिकाणी चांगलं वातावरण, काम- आयुष्य यात संतूलन राखेल अशी नोकरी हवी असते. चांगला पगार ही गोष्ट केवळ ११ % तरुणांना महत्त्वाची वाटते असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 

लांब, सडक केसांसाठी या टीप्स नक्की ट्राय करा

छोट्या शहरातील आणि खेडेगावातील ७९ % तरुण यात सहभागी झाले होते.  सर्वाधिक लोकसंख्या ही लहान शहरांत किंवा खेडेगावात राहते. या तरुणांना खासगी नोकरींपेक्षा सार्वजनिक क्षेत्रात किंवा सरकारी नोकरीत अधिक रस अतो , असं ऑलिव्ह बोर्डचे सह संस्थापक अभिषेक पाटील म्हणाले.