पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नारळ पाण्यापासून फेसपॅक आणि त्वचा ठेवा तजेलदार

नारळपाणी

उन्हामुळे अनेकांच्या त्वचेवर पुरळ उठतं,  घामोळ्या येतात. प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्वचा निस्तेज व काळवंडते. आपण यासाठी विविध उपाय करून पाहतो.  याकाळात त्वचेची  आतून तसेच बाहेरून काळजी घेणं आवश्यक आहे ती कशी घ्यायची ते पाहू. 

नारळ पाणी : उन्हाळ्यात शरीराची होणारी आग क्षमवण्यासाठी नारळपाणी हे खूपच फायदेशीर आहे. नारळपाणी म्हणजे एक रिफ्रेशिंग ड्रिंक्स असंही म्हणता येईल. नारळपाण्यात पोटॅशियम, सोडियम, व्हिटामिन्ससारखे गुणधर्म असतात. त्यामुळे  उन्हाळ्यात नारळ पाण्याचं सेवन आवर्जून करावं.

नारळ पाण्यापासून फेसपॅक 
नारळ पाण्यात चिमूटभर हळद, एक चमचा चंदन पावडर आणि काही थेंब टी ट्री ऑईल टाकून फेसपॅक करता येतो. हा फेसपॅक चेहऱ्यासाठी उन्हाळ्यात उत्तम आहे.

कोरफड आणि काकडी फेसपॅक
अॅसिडिटी आणि गॅसचा होणारा त्रास कोरफडीच्या ज्यूसनं कमी होतो. तर शरीराला थंड ठेवण्यासाठी काकडी मदत  करते. आहारात या दोघांचा समावेश करण्याबरोबरच उन्हाळ्यातील त्वचेचा काळवंडलेपणा दूर करण्यासाठी काकडी आणि कोरफडीचं उत्तम फेसपॅक होऊ शकतं. 

फेसपॅक 
कोरफडीचा गर आणि काकडी किसून एकजीव करावी हे मिश्रण चेहऱ्याला लावावं. ४५ मिनिटांनी चेहरा  धुवून टाकावा. यामुळे  पुरळ निघून जाते  चेहऱ्याची कांती उजळ होते. 

टोमॅटो आणि बीट
उन्हाळ्यात तेलकट, जड पदार्थ खाल्ल्यानं शरीरास त्रास होतो. अशावेळी टोमॅटो आणि बीटचं सूप  शरीरास फायदेशीर ठरतं. सूप हे पचायला हलकं असतं. 

फेसपॅक 
टोमॅटो पेस्टमध्ये  बीटाचा सर मिक्स करून  फेसपॅक तयार करावा. ३० मिनिटे हा फेसपॅक चेहऱ्यावर ठेवावा. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाते पण त्याचप्रमाणे चेहराही उजळतो. बीटामुळे चेहऱ्यावर गुलाबीसर रंगही दिसतो. 

पुदीना : पुदीना हा अॅसिडीटी कमी करतो. उन्हाळ्यात जेवणात आवर्जून पुदीन्याचाही सहभाग करावा. पुदिन्यामध्ये अ, क व ई जीवनसत्त्व भरपूर  प्रमाणात आहेत.