पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुहानाच्या एका ड्रेसची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

सुहाना खान

 शाहरूखची मुलगी सुहाना ही अनेकदा चर्चेत असते. सुहाना शाहरुखच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चा सुरु आहेत. आपल्या ग्लॅमरस स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेली सुहाना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सारानं सुरू केला स्वस्तात मस्त कपड्यांचा ट्रेंड

नववर्षाच्या पार्टीसाठी सुहाननं परिधान केलेला ग्लॅमरस ड्रेस चर्चेचा विषय ठरला आहे. या ड्रेसची किंमत लाखोंच्या घरात आहे. शाहरूखनं आपल्या अलिबाग येथील आलिशान बंगल्यावर ३१ पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी सुहानाची जवळची मैत्रीण अनन्या पांडेदेखील उपस्थित होती. 

नेहा पेंडसेच्या त्या रोमँटीक फोटोची सोशल मीडियावर चर्चा

विशेष म्हणजे पार्टीसाठी सुहानानं निवडलेल्या ब्लॅक ड्रेसची चर्चा पहायला मिळाली या ड्रेसची किंमत भारतीय मुल्यानुसार अंदाजे २ लाख ७० हजार आहे.  पॅरीसमधल्या एका आलिशान महागड्या ब्रँडचा हा ड्रेस आहे.