उन्हाळामुळे होणारी अंगाची आग, घामाच्या धारा यामुळे सगळेच हैराण असतात. प्रवासात तर अंग घामानं चिंब भिजतं, अशावेळी घराबाहेर पडणं अक्षरश: असह्य होतं. उन्हाचा पारा चढला की नुसतं एसीच्या गार हवेत बसून राहावंसं वाटतं. हल्ली पोर्टबेल फॅनचा पर्याय उपलब्ध आहे, मात्र हातात छोटा पोर्टबेल फॅन घेऊन फिरणं अवघडल्यासारखं वाटतं. पण सोनी कंपनीनं या समस्येवर उपाय शोधला आहे. या कंपनीनं फोनच्या आकाराचा वेअरेबल एसी लाँच केला आहे.
४८ मेगापिक्सेल विसरा, शाओमी आणणार ६४ मेगापिक्सेल कॅमेरा असणारा फोन
म्हणजे शब्दश: हा एसी तुम्ही परिधान करू शकता. यासाठी कंपनीनं इनरवेअर लाँच केले आहेत. या इनरवेअरमध्ये छोटा एसी ठेवण्यासाठी पॉकेट देण्यात आलं आहे. हा एसी मोबाइल हँडसेटइतकाच स्लिम आहे. त्यामुळे तो पटकन कळून येत नाही. त्यावर शर्ट, ब्लेझर, टिशर्ट तुम्ही परिधान करू शकता. मात्र हे इनरवेअर केवळ पुरुषांसाठी आहेत.
या वेअरेबल एसीला रेऑन पॉकेट असं नाव कंपनीकडून देण्यात आलं आहे. फोनच्या साहाय्यानं या एसीचं तापमान वाढवता किंवा कमी करता येणार आहे. सध्या जपानमध्येच प्रायोगिक तत्त्वावर हे उत्पादन लाँच करण्यात आलं आहे. जर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर याचं उत्पादन थांबवण्यात येणार आहे.