पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Health Tips: हिवाळ्यात चेहऱ्याची अशी घ्या काळजी!

त्वचेची अशी घ्या काळजी

आपल्यापैकी बरेच जण अशी आहेत जे तरुण दिसतात मात्र त्यांचा चेहरा चमकदार दिसत नाही. तसंच अगदी लहान वयातच त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याच्या त्रासाला हमखास अनेकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे हिवाळ्यात आपण आपल्या आहारात काही खास फळांचा आणि पदार्थांचा समावेश केला पाहिजे -

दही - 
दह्यापासून तयार केलेला रायता आणि लस्सी तुमच्या पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे. हेच दही तुमच्या त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे. दह्यामध्ये तांदळाचे पीठ किंवा चन्याचे पीठ मिसळून ते चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतील. 

लिंबू - 
लिंबाचा रस केवळ आपल्या पोटासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. दररोज लिंबाचे पाणी पिण्यामुळे आपल्या पोटाच्या समस्या दूर होतात. तसेच, तुम्ही लिंबाचा रस पाणी किंवा ग्लिसरीनमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. त्यामुळे चेहरा चमकदार बनतो. 

टरबूज - 
बहुतेक लोकांना टरबूज खायला आवडते. टरबूज खाणे शरिरासाठी तसेच त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.  टरबूजचा रस तुम्ही चेहऱ्यावर देखील लावू शकता. 

दूध - 
दूधाला संपूर्ण आहार म्हणतात. दररोज किमान दोन ग्लास दूध प्यायला पाहिजे. तुम्ही सकाळी आणि रात्री एक-एक ग्लास दूध पिऊ शकता. चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्यामुळे चेहरा मऊ होतो. 

सफरचंद - 
जेवणात दररोज एक सफरचंद खाल्ले पाहिजे. तसेच, तुम्ही सफरचंदाचा रस चेहऱ्यावर लावू शकता. सफरचंदापासून व्हिनेगर देखील तयार करतात. सफरचंदाचा रस चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असतो.