पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सिद्धार्थ जाधवचा साधा पण प्रभावी लूक पाहिलात का?

सिद्धार्थ जाधव

व्यक्तीरेखा गंभीर असो किंवा विनोदी अभिनेता   सिद्धार्थ जाधवनं आपल्या सहज अभिनयानं ती व्यक्तीरेखा हिट करून दाखवली. अगदी लहानातली लहान भूमिका ते लीड रोलपर्यंतच्या भूमिकेत  सिद्धार्थनं स्वत:ला उत्तमप्रकारे समावून घेतलं. 'खो- खो', 'टाइम प्लीज',  'दे धक्का', 'ये रे ये रे पैसा', 'सिम्बा', 'धुरळा' सारख्या अनेक चित्रपटात सिद्धार्थनं साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडून आहेत. 

मराठी सेलिब्रिटींचे हे हटके साडी ट्रेंड तुम्ही नक्की ट्राय करा

नुकताच सिद्धार्थ 'धुरळा' चित्रपटात दिसला. या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटदरम्यानचा फोटो  सिद्धार्थनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.  सिद्धार्थचा कुडत्यामधला साधा पण प्रभावी लूक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सिद्धार्थ अनेक मराठी कलाकारांप्रमाणे त्याच्या स्टाइलमध्ये विविध प्रयोग करून पाहत आहे, विशेषत: सिद्धार्थच्या चाहत्यांना हे लूक आवडतही आहेत. 

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या पुरस्कार सोहळ्यात सिद्धार्थला  'फेवरेट स्टाईल आयकॉन'  या विभागासाठी नामांकनं मिळालं होतं. अंकुश चौधरी, अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव, आदिनाथ कोठारे, स्वप्नील जोशी आणि आकाश ठोसर 'फेवरेट स्टाईल आयकॉन' होण्यासाठी नामांकित करण्यात आले होते. हा पुरस्कार अभिनेता अंकुश चौधरीनं जिंकला असला तरी त्यानं हा पुरस्कार सिद्धार्थला समर्पित केला होता. 

आय मेकअपचे २०२० मधले हे आहेत नवे ट्रेंड्स

सिद्धार्थ स्टाइलवर विशेष मेहनत घेत आहे, तो विविध प्रयोग करून पाहत आहे त्यामुळे 'फेवरेट स्टाईल आयकॉन' तोच आहे असं म्हणत अंकुशनं हा पुरस्कार सिद्धार्थच्या हाती ही दिला होता.