पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सकाळी राजाप्रमाणे न्याहारी करावी का?

 राजाप्रमाणे न्याहारी करावी का?

सकाळी उठल्या उठल्या एखाद्या राजाप्रमाणे अर्थात भरपूर पोटभर न्याहारी करावी हा आधुनिक आहारतज्ज्ञांकडून दिला जाणारा एक ढोबळ सल्ला. ढोबळ यासाठी की आरोग्य किंवा आहारासंबंधित एखादा विचार पटला किंवा त्यावर जगाच्या पाठीवरील एखाद्या देशामध्ये तेसुद्धा मर्यादित संख्येच्या विशिष्ट गटावर  संशोधन झाले की ते अखिल पृथ्वीवरच्या समस्त मानवजातिला लागू होईल असा समजले जाते. वास्तवात पृथ्वीवरच्या विविध खंडांमधील, विभिन्न देशांमधील, वेगवेगळ्या प्रांतांमधील, भिन्न-भिन्न भौगोलिक वातावरणामध्ये  वंश, शरीर, प्रकृती, पंथ, धर्म आणि तदनुसार सवयी-चाली-रिती एकंदरच जीवनशैली संपूर्णतः असमान असणार्‍या विविध प्रकारच्या माणसांना एकच सल्ला देणे हे ढोबळ नाही तर काय म्हणावे? 

ऑफिस बॅगचं वजन नेमकं हवं तरी किती?

राजासारखा भरपूर नाश्ता करावा हा सल्ला जात्याच ज्यांची भूक प्रखर आहे अशा सुदृढ-स्वस्थ व्यक्तींना किंवा निसर्गतः ज्यांना भूक सहन होत नाही अशा पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना लागू होईल, मात्र सर्वसाधारण व्यक्तींचे काय? भूक नसतानाही त्यांनी या सल्ल्याचे पालन करुन सकाळी राजासारखा नाश्ता करावा काय? आयुर्वेदानुसार भूक लागलेली नसताना अन्नसेवन करणे हेच तर  अनारोग्याचे मूळ कारण आहे.

ब्रेकफ़ास्ट म्हणजे रात्रभर पोट रिकामे असते, म्हणून सकाळी उठल्यावर भरपूर नाश्ता करावा व फ़ास्ट (उपवास) ब्रेक करावा‌ असे यांचे मत. काय आपले शरीर सकाळी-सकाळी उठल्या -उठल्या आहार-ग्रहणासाठी तयार असते? या प्रश्नाचे उत्तर (अर्धशिशीसारख्या पित्तविकाराचे  रुग्ण व ज्यांचा अग्नी प्रखर असतो, अशा पित्तप्रकृतीच्या व्यक्तींसारखे अपवाद वगळता) "नाही" असेच द्यावे लागेल. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा शरीराचे तापमान तुलनेने कमी असते, शरीराचा मेटाबोलिक रेटही मंदावलेला असतो, यालाच आयुर्वेद "अग्नी मंद असतो" असे म्हणते. अग्नी मंद असतो, म्हणजे भूक व पचनशक्ती उत्तम नसते, त्यामुळे अशा अवस्थेत शरीराने ग्रहण केलेले अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे शरीराला पोषण देण्या‌ऎवजी रोगकारक होण्याची शक्यता जास्त. याचबरोबर सकाळी उठल्यानंतर ’आदल्या  रात्री सेवन केलेले अन्न पचले आहे का?’ हे पाहाणे सुद्धा महत्त्वाचे असते. 

सौंदर्य खुलवण्यासाठी या घरगुती उपायांचा वापर जपून करा

आजच्या वेगवान-व्यस्त जीवनामध्ये तुम्ही जेव्हा रात्री उशिरा जेवता व जेवणानंतर लगेच झोपता, तेव्हा सकाळी उठल्यानंतर ते रात्रीचे जेवण  पचलेले असण्याची शक्यता कमी असते म्हणूनच असे रात्री सेवन केलेले  अन्नच जेव्हा पचलेले नसते, तेव्हा    केवळ ’ आधुनिक  आहारशास्त्र’ सांगते, म्हणून सकाळी भूक नसतानाही राजासारखा  "ब्रेकफ़ास्ट" करणे योग्य नाही. कारण भूक नसताना केले जाणारे हे अन्नसेवन एक नव्हे विविध रोगांना आमंत्रण देणारे हो‌ऊ शकते.

मथितार्थ :  आपल्या भुकेचा अंदाज  घे‌ऊनच सकाळी "ब्रेकफ़ास्ट" करायचा की नाही आणि करायचा तर कधी व कोणता करायचा ते ठरवा.

 

डॉ. अश्विन सावंत 

drashwin15@yahoo.com