पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शनिचा मकर राशीत प्रवेश, तुमच्या राशीला काय फळ मिळणार?

शनी बदल आणि राशींसाठी फलप्राप्ती

आज मौनी अमावस्या आहे. त्याचवेळी शनी आजच मकर राशीत प्रवेश करतो आहे. फलज्योतिषामध्ये शनी ग्रहाला विशेष महत्त्व असते. त्यामुळे शनी बदलाकडे उत्सुकतेने बघितले जाते. शनी शुक्रवारी मकर राशीत प्रवेश करीत असल्यामुळे वृश्चिक राशीची साडेसाती संपणार आहे. त्याचवेळी कुंभ राशीला साडेसाती सुरू होणार आहे. शनी एका राशीत अडीच वर्षे राहतो. शनी बदलाचा माणसांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होत असल्याची धारणा आहे. 

कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे आणि खबरदारी कशी घ्यावी

शनी हा न्यायदेवता म्हणून ओळखला जातो. त्यामुळे प्रामाणिक मेहनत घेणाऱ्या आणि कर्मावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींना यश मिळते, असे म्हणतात. शनी मकर राशीत प्रवेश करीत असल्यामुळे मेष, कर्क, तूळ आणि मकर राशींसाठी राजयोग निर्माण होत असल्याचे म्हटले जाते.

ज्योतिषाचार्य पूनम वार्ष्णेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, २४ जानेवारीला सकाळी नऊ वाजून ३५ मिनिटांनी शनीने मकर राशीत प्रवेश केला. ११ मे २०२० रोजी तो याच राशीत वक्री होतो आहे. तो पुढील १४२ दिवस म्हणजेच २९ डिसेंबर २०२० पर्यंत वक्री स्थितीत राहणार आहे. सध्या धनू, मकर आणि कुंभ राशीला साडेसाती सुरू आहे. 

'जितना उसके सिर पर बाल नहीं उतना मेरे पास माल है'

वेगवेगळ्या राशींना काय फळ मिळणार
मेष - नोकरीमध्ये बढती, उत्पन्न वाढेल
वृषभ - राजकृपा, लोकप्रियता वाढेल
मिथुन - कामात अडचणी येतील, घरात वादविवाद होऊ शकतात.
कर्क - अचानक धनलाभ, व्यापारातून लाभ
सिंह - न्यायालयीन लढाईत यश, आजारांपासून मुक्ती
कन्या - भूमी-वाहन योग, आईकडून फायदा
तूळ - धार्मिक कामात रुची, स्पर्धा परीक्षांमध्ये यश
वृश्चिक - उत्पन्नात वाढ, संकटांपासून मुक्ती
धनू - मानसन्मान वाढेल. साठवलेल्या संपत्तीत वाढ होईल.
मकर - अर्धवट राहिलेल्या कामात यश मिळेल. कुटुंबात वाढ होईल.
कुंभ - विदेश गमनाचे योग, मानसिक त्रास
मीन - सर्व कामात यश, खर्चात वाढ

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shani dev in its zodiac makar capricorn today mauni amavasya know effects on all zodiac signs astrological predictions