पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Children’s Day 2019 : डुडलमागची संकल्पना आहे ७ वर्षांच्या मुलीची

गुगल डुडल

देशात १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जात आहे.  दरवर्षीप्रमाणे गुगलनंही खास डुडलद्वारे बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे आजच्या डुडलमागची संकल्पना ही ७ वर्षांच्या एका मुलीची होती. 

'भाजपपेक्षा शिवसैनिकांना नरेंद्र मोदींचा जास्त आदर आणि म्हणूनच...

दिव्यांशी सिंघल असं या मुलीचं नाव असून तिनं काढलेलं डुडल गुगलनं बालदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी वापरलं आहे, 'मी मोठी झाल्यावर, मी आशा करते...' ही यंदाच्या गुगल डुडलची संकल्पना होती. तुम्ही मोठं झाल्यावर आजूबाजूला कोणता बदल अपेक्षित आहे साधरण अशी मूळ संकल्पना होती. या संकल्पनेला अनुसरून १ लाखांहून अधिक मुलांनी आपलं डुडल गुगल इंडियाला पाठवलं होतं. यात पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या मुलांचा समावेश होता.  

VIDEO : रस्त्यावर सांडलेले मासे पळवण्यासाठी स्थानिकांची झुंबड

दिव्यांशीनं 'झाडं चालू लागली'  या संकल्पनेवर डुडल रेखाटलं. 'मी मोठी झाल्यावर मी आशा करते की आजूबाजूची झाडंही चालू लागतील, उडू लागतील. त्यामुळे खूप कमी वृक्षतोड होईल.  माणसं झाडं तोडण्याऐवजी ते झाडांना दुसरीकडे जाण्यासाठी सांगू शकतील', अशी कल्पना वापरून दिव्यांशीनं आजचं डुडल रेखाटलं. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:seven year old girl Divyanshi Singhal sketch was selected as the doodle for Childrens Day 2019