पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सारानं सुरू केला स्वस्तात मस्त कपड्यांचा ट्रेंड

सारा अली खान

सेलिब्रिटींची स्टाईल म्हटलं की महागडे, आलिशान ब्रँडचे कपडे, अॅक्सेसरी, चपला, बॅग्स यांची चर्चा ही नेहमीच होते. त्यांची  स्टाईल कॉपी करणं म्हणजे अनेक चाहत्यांच्या खिशाला न परवडण्यासारखंच. रुपेरी पडद्यावरचे सेलिब्रिटी नेहमीच आपले कपडे, अॅक्सेसरीजवर लाखोंपासून ते कोट्यवधी रुपये खर्च करतात. मात्र  आताच्या पिढीची अभिनेत्री सारा अली खान मात्र या सगळ्यांहूनही वेगळी  ठरली आहे.  सेलिब्रिटी फॅशन म्हणजे महागडे, डिझाइनर कपडे हा ट्रेंड तिनं पूर्णपणे  खोडून टाकला आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून सारानं कमी किमतीतले एथनिक ड्रेसेस परिधान करण्याचा नवा  ट्रेंड पाडला  आहे. गेल्या काही महिन्यात सारा आपल्या आलिशान लाइफस्टाइलपेक्षाही स्वस्तात मस्त फॅशनस्टाइलमुळे चर्चेत आली आहे. सारानं ग्लोबल देसी ब्रँडचा  कुडता आणि पॅट परिधान केली होती. ज्याची किंमत ही जवळपास २२०० रुपये होती. 

यापूर्वीही सारानं एका कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमासाठी सारानं २५०० चा मॅक्सी ड्रेस परिधान केला होता. 'केदारनाथ' प्रदर्शित होण्यापूर्वी सारा आपल्या आईसोबत स्ट्रीट शॉपिंग करताना दिसली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

She surely knows how to woo the paps #saraalikhan

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

जिथे नेहमीच फॅशनविश्वात महागड्या डिझाइनर्स कपड्याची चर्चा पहायला  मिळते तिथे सारानं मात्र आपल्या नव्या फॅशन स्टाइलनं आपलं वेगळं  स्थान निर्माण केलं आहे.