पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सर्वात महागड्या 'Galaxy Fold' च्या हजारो हँडसेटची ३० मिनिटांत विक्री

गॅलेक्सी फोल्ड

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला सॅमसंगचा 'गॅलेक्सी फोल्ड' हा बहुचर्चीत फोन या ११ ऑक्टोबर पासून ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. पण तत्पूर्वी या फोनची प्री- बुकिंग सुरू करण्यात आली. दीड लाखांहून अधिक किंमत असलेल्या या फोनला भारतीयांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. केवळ अर्ध्या तासांत गॅलेक्सी फोल्ड'चे १ हजार ६०० हँडसेट विकले गेले असा दावा कंपनीनं केला आहे. 

या फोनची भारतातील किंमत ही १ लाख ६४ हजार ९९९ रुपये आहे. प्री बुकिंग केलेल्या हजारो ग्राहकांनी या फोनचे  संपूर्ण पैसे भरले असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. 

डीलीट केलेल्या व्हॉट्स अ‍ॅप मेसेजचा आता मागमूसही राहणार नाही

फीचर्स
- ४.६ इंचाचा एचडी अॅमोलेड डिस्प्ले
- अनफोल्ड केल्यानंतर ७.३ इंचाचा डिस्प्ले 
- १२ जीबी रॅम
- एकूण पाच कॅमेरा फोनमध्ये आहेत. यात १६ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड सेन्सॉर
- १२ मेगापिक्सेल वाइड अँगल लेन्स
- १२ मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स
- याव्यतिरिक्त १० आणि ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा फोनमध्ये देण्यात आला आहे.

सवलतीच्या काळात एका सेकंदाला शाओमीच्या १० हँडसेटची विक्री

 हा फोन नावाप्रमाणेच मधून दुमडता येणार आहे. मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रातला हा नवीन आविष्कारच म्हणता येईल. हा फोन एप्रिलमध्ये लाँच होणार होता मात्र काही तांत्रिक अडचणी असल्यानं या फोन लाँचिंगची तारीख पुढे ढकलण्यात आली.