पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सॅमसंगचे तीन नवे स्मार्ट वॉच भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

स्मार्ट वॉच

सॅमसंग कंपनीने आपलं गॅलेक्सी वॉच अॅक्टीव्ह, गॅलेक्सी फिट आणि गॅलेक्सी फिट ई अशी तीन नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच केली आहे. या स्मार्ट वॉचच्या किंमती अडीच हजारांपासून  ते २० हजारांच्या घरात आहेत.

या स्मार्टवॉचमध्ये एक्सरसाइज ट्रॅकिंग, स्लीप ट्रॅकिंग, स्ट्रेस ट्रॅकिंग, हार्ट रेट सेंसॉर आणि हेल्थ ट्रॅकिंग यांसारखे अनेक फीचर्स आहेत. नव्या पीढीला आकर्षित करणारे अनेक फीचर या स्मार्ट वॉचमध्ये आहेत. जे आपल्या आरोग्याबद्दल अधिक सजग आहेत त्यांच्यासाठी  हे  वॉच चांगले आहेत. तरुण पिढीचं फिटनेसला अधिक महत्त्व आहे त्यामुळे या स्मार्ट वॉचद्वारे हार्ट रेट,  ब्लड प्रेशर अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टींची माहिती मिळणार आहे. 

ही स्मार्ट वॉच वजनानं हलकी असल्यानं त्याचप्रमाणे हाताळायलाही सोपी असल्यानं पूर्ण दिवस वापरायला हरकत नसल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. सॅमसंगच्या शॉपमध्ये तसेच अनेक ई कॉमर्स साइट्वर हे स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. 

गॅलेक्सी वॉच अॅक्टीव्ह हे ब्लॅक, डीप ग्रीन, रोझ गोल्ड आणि सिल्व्हर अशा चार रंगात हे उपलब्ध आहेत. तर गॅलेक्सी फिटमध्ये ग्राहकांना सिल्व्हर आणि ब्लॅक असे दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत.  गॅलेक्सी फिट ई  ब्लॅक, व्हाईट आणि यलो अशा तीन रंगात उपलब्ध असणार आहे. 

किंमत 
गॅलेक्सी वॉच अॅक्टीव्ह - १९, ९९० रुपये 
गॅलेक्सी फिट -  ९,९९० रुपये
गॅलेक्सी फिट ई - २,५९० रुपये