पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सॅमसंगचा ‘Galaxy Fold’ भारतातला सर्वाधिक महागडा स्मार्टफोन

गॅलेक्सी फोल्ड

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला सॅमसंगचा 'गॅलेक्सी फोल्ड' हा बहुचर्चीत फोन पुढील आठवड्यापासून विक्रीसाठी  उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत ही दीड लाखांहून अधिक असल्यानं भारतातील  सर्वाधिक महागड्या फोनपैकी तो एक ठरला आहे. 

'गॅलेक्सी फोल्ड'ची ११ ऑक्टोबरपासून प्री- बुकिंग सुरू होणार आहे. २० ऑक्टोबरपासून हा फोन ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन नावाप्रमाणेच मधून दुमडता येणार आहे. मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रातला हा नवीन आविष्कारच म्हणता येईल. हा फोन एप्रिलमध्ये लाँच होणार होता मात्र काही तांत्रिक अडचणी असल्यानं फोन लाँचिंगची तारीख पुढे ढकलण्यात आली.

वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या मुंबईकरांचा कार पुलिंगकडे वाढतोय कल

फीचर्स
- ४.६ इंचाचा एचडी अॅमोलेड डिस्प्ले
- अनफोल्ड केल्यानंतर ७.३ इंचाचा डिस्प्ले 
- १२ जीबी रॅम
- एकूण पाच कॅमेरा फोनमध्ये आहेत. यात १६ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड सेन्सॉर
- १२ मेगापिक्सेल वाइड अँगल लेन्स
- १२ मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स
- याव्यतिरिक्त १० आणि ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा फोनमध्ये देण्यात आला आहे.
भारतात या फोनची एकूण किंमत ही १ लाख ६४ हजार ९९९ रुपये आहे.