पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या व्यक्ती करतात सर्वाधिक गॉसिपिंग

गॉसिपिंग

गॉसिपिंग करणं हा अनेकांच्या आयुष्यातील नित्याचा भाग बनला आहे. एखाद्या विषयावर गॉसिपिंग करणं हा वेळेचा अपव्यय असतो ही गोष्ट अनेकांच्या लक्षात येत नाही. तेवढाच काय तो विरंगुळा आणि आजूबाजूला काय चाललंय याच्या अपडेट आम्ही घेतोय असंही काहीजण गमतीनं म्हणतात. पण कोणी कितीही नाकारलं तरी गॉसिपिंग  करण्याची एक वाईट सवय आपल्याला  जडली आहे. कॅलिफोर्निया विद्यापिठाच्या संशोधनानुसार एक व्यक्ती दिवसातील जवळपास ५२ मिनिटं ही केवळ गॉसिपिंगसाठी खर्च करत असते. 

कोण करतं सर्वाधिक गॉसिपिंग
जे मितभाषी असतात ते गॉसिपिंगच्या फंद्यात फारसं पडत नाही मात्र ज्यांचा स्वभाव फार बोलका  असतो अशा व्यक्तींना गॉसिपिंगमध्ये सर्वाधिक रस असतो. 
श्रीमंतामध्ये गॉसिपिंग अधिक 
असं म्हणतात महिला सर्वाधिक गॉसिपिंग करतात. मात्र कॅलिफोर्निया विद्यापिठाच्या संशोधनात एक वेगळीच गोष्ट समोर आली  आहे. या संशोधनानुसार गरिब, मध्यमवर्गीयांपेक्षाही श्रीमंत लोकांमध्ये  गॉसिपिंगचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. 
काय असतात विषय 
दिवसातील १६ तासांपेक्षा १४ टक्के लोक हे कामादरम्यान गप्पा  मारतात. या  गप्पा गोष्टींचा विषय सकारात्मक असण्यापेक्षा नकारात्मक अधिक असतो.  नकारात्मक गोष्टींची चर्चा ही दुपटीनं होते. संशोधनानुसार सेलिब्रिटीं किंवा अन्य  नावाजलेल्या व्यक्तीपेक्षा ओळखीच्या व्यक्तींविषयी गॉसिपिंग करणं लोकांना अधिक आवडतं असं यात म्हटलं आहे. तरुण  वर्गात गॉसिपिंगचं प्रमाण हे  अधिक असतं  विषेशत: त्यांच्या गॉसिपिंग या  नकारात्मकतेकडे झुकणाऱ्या अधिक असतात असं यात म्हटलं आहे.