पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रिअलमी XT १३ सप्टेंबरला भारतात लॉन्च होणार

रिअलमी XT

रिअलमी कंपनीने जगातील पहिल्या ६४ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला रिअलमी XT मोबाईल लॉन्च केला होता. मात्र या मोबाईलचे लॉन्चिंग फक्त चीनमध्ये झाले होते. आता रिअलमी कंपनी भारतामध्ये हा मोबाईल लॉन्च करणार आहे. कंपनीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबतची माहिती दिली आहे. येत्या १३ सप्टेंबर रोजी हा मोबाईल भारतात लॉन्च करण्यात येणार आहे.

प्रत्येक भारतीयाने देशहितासाठी संकल्प करावा, मोदींचा नवा मंत्र

मिळालेल्या माहितीनुसार, रिअलमी XT मोबाईलमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७१२ प्रोसेसर आहे. तसंच या फोनला ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. या फोनमध्ये ४ जीबी + ६४ जीबी, ६ जीबी + ६४ जीबी आणि ८ जीबी + १२८ जीबी अशा तीन स्टोरेज पध्दती असणार आहे. या फोनमध्ये ६.४ इंचाचा सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तर ४००० एमएएच बॅटरी असणार आहे. कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचे तर यात ६४ मेगापिक्सेल कॅमेरा असणार आहे. 

काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत

दरम्यान, काही दिवसांपूर्वी  रिअलमी कंपनीनं  रिअलमी XT या आपल्या पहिल्या फोनचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. कमी सूर्यप्रकाशातही या फोनद्वारे चांगले फोटो येतील असा विश्वास कंपनीनं व्यक्त केला आहे. रिअलमीबरोबरच शाओमी कंपनी देखील ६४ मेगापिक्सेल कॅमेरा फोन लाँच करणार आहे. 

आणि मोदी म्हणाले, उद्धव माझा लहान भाऊ