पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रिअलमी लाँच करणार जगातील पहिला ६४ मेगापिक्सेल कॅमेरा फोन

रिअलमी एक्सटी

रिअलमी कंपनीनं जगातील पहिल्या ६४ मेगापिक्सेल कॅमेरा फोनचा फोटो शेअर केला आहे.  रिअलमी ही चिनी कंपनी आहे. या कंपनीनं  रिअलमी XT या आपल्या पहिल्या फोनचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

सॅमसंगचा Galaxy A10s भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

या महिन्याच्या सुरूवातीला रिअलमी कंपनीनं   ६४ मेगापिक्सेल कॅमेरा फोन लाँच करणार असल्याची  घोषणा भारतात केली होती. भारतात दिवाळीच्या आधी हा फोन लाँच होणार असल्याचं म्हटलं जात आहे. रिअलमी XT बरोबरच कंपनी ६४ मेगापिक्सेल असलेले आणखी तीन फोन लाँच करणार असंही म्हटलं जात आहे. कमी सूर्यप्रकाशातही या फोनद्वारे चांगले फोटो येतील असा विश्वास कंपनीनं व्यक्त केला आहे. 

अँड्राईडसाठी व्हॉट्स अ‍ॅप आणणार हे नवे फीचर्स

रिअलमीबरोबरच शाओमी कंपनी देखील ६४ मेगापिक्सेल कॅमेरा फोन लाँच करणार आहे.