कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे अनेक नियोजित गोष्टी पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. विविध कार्यक्रम आयोजकांना पुढे न्यावे लागले आहेत. याचा फटका मोबाईल हँडसेट उत्पादक कंपन्यांनाही बसला आहे. काही मोबाईल हँडसेटचे लाँचिंग यामुळे पुढे नेण्यात आले आहे.
चीननंतर स्पेनमध्ये कोरोनाचा कहर; एका रात्रीत ७०० नागरिकांचा मृत्यू
शाओमी आणि रिअलमी या दोघांनाही आपले नियोजित लाँचिंग पुढे नेत असल्याचे जाहीर केले आहे. विवोनेही आपले नियोजित लाँचिंग पुढे नेण्याची घोषणा केली आहे.
रिअलमी नार्झो १० आणि नार्झो १० ए
रिअलमीची नवे स्मार्टफोन २६ मार्चला बाजारात येणार होते. पण कंपनीने बुधवारीच या दोन्ही स्मार्टफोनचे लाँचिंग तूर्त पुढे ढकलले आहे. रिअलमीने भारतातील उत्पादनही तूर्त बंद केले आहे.
शाओमी एमआय१०
शाओमीने आपल्या एमआय१० स्मार्टफोनचे लाँचिंग पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. हे लाँचिंग ३१ मार्चला होणार होते. लवकरच कंपनीकडून नवीन तारीख जाहीर करण्यात येईल.
महाभारत १८ दिवसांत जिंकले होते, कोरोनाची लढाई २१ दिवसांत जिंकू : मोदी
विवो व्ही१९
विवोने आपले सर्व आगामी लाँचिंग स्थगित केले आहेत. विवोकडून व्ही१९ स्मार्टफोन लवकरच बाजारात आणला जाणार होता. सुरुवातीला त्याचे लाँचिंग ३ एप्रिलपर्यंत पुढे नेण्यात आले होते. पण आता २१ दिवसांच्या लॉकडाऊननंतर हे लाँचिंग आणखी पुढे नेण्यात येणार आहे.