पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आला जमाना स्कर्ट सूटचा!; प्रियांका, सोनमकडून खुबीने वापर

प्रियांका चोप्रा आणि सोनम कपूर

८० आणि ९० च्या दशकामध्ये प्रिन्सेस डायना ज्याचा सर्वाधिक वापर करीत होती. ते स्कर्ट सूट पुन्हा एकदा फॅशनमध्ये आणि चर्चेत आले आहेत. सध्याच्या काळात अनेक तरुणींकडून स्कर्ट सूटचा वापर केला जातो. त्याचबरोबर काही सेलिब्रिटींकडूनही जाणीवपूर्वक काही स्कर्ट सूट वापरले जातात. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल, ओप्रा विनफ्रे आणि राजघराण्यातील महिला यांचा समावेश होतो. सध्याच्या काळात चर्चेत असलेल्या या पेहरावाचा अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि सोनम कपूर या दोघीही खुबीने वापर करताना दिसतात. त्यांच्यावर स्कर्ट सूट खुलून दिसतात.

न्यूयॉर्क शहरामध्ये फिरायला बाहेर पडल्यावर प्रियांका चोप्राने घातलेला हा स्कर्ट सूट तिच्यावर खूपच उठून दिसतो. प्रियांकाचे रूप या स्कर्ट शूटमुळे खुलून दिसते. प्रियांकाच्या डोळ्यावरील गॉगल, हाय हिल्स आणि हातातील बँग हे सगळेच तिच्या स्कर्ट सूटला साजेसे आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@priyankachopra x custom @viviennewestwood #styledbymimicuttrell #royalwedding @patidubroff @kenorourke1

A post shared by Mimi Cuttrell (@mimi) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@priyankachopra x @dionlee @latenightseth #styledbymimicuttrell assisted by: @katieschust

A post shared by Mimi Cuttrell (@mimi) on

अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा स्कर्ट आणि शर्ट त्यावर जॅकेट असा पेहराव केला होता. गेल्या काही महिन्यांमध्ये सोनम वेगवेगळ्या रंगाच्या स्कर्ट सूटमध्ये दिसली होती. सोनमला जास्त लांबीचे स्कर्ट घालायला आवडतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#ficciflo

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

जान्हवी कपूरही काही दिवसांपूर्वी स्कर्ट सूट आणि जॅकेट अशा पेहरावात दिसली होती.