पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रिन्सेस डाएना यांच्या त्या ड्रेसचा अखेर लिलाव, कमी किमतीत बोली

प्रिन्सेस डाएना यांच्या त्या ड्रेसचा लिलाव अपयशी

प्रिन्सेस डाएना यांचं काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झालं, मात्र निधनानंतर इतकी वर्षे उलटली तरी त्यांची लोकप्रियता ही तितकीच आहे. ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्सेस डाएना या समान्य जनतेत सर्वांत प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींपैकी होत्या. सर्वसामान्य माणसांत त्यांचं सहजपणे वावरणं, त्यांची स्टाईल, त्यांचा बंडखोरपणा सर्वांनाच आवडायचा. त्यांच्यावर जगभरातील अनेक भाषांमध्ये भरभरून लिहिण्यात आलं आहे.  त्यांच्या अनेक चिजवस्तूंची लिलावात विक्री करण्यात आली आहे. नुकताच त्यांचा प्रसिद्ध गाऊन लिलावात विक्रीसाठी ठेवण्यात आला होता, मात्र त्याला अपेक्षप्रमाणे किंमत मिळाली नाही.

सौंदर्य खुलवण्यासाठी फायदेशीर मेथीचे दाणे, जाणून घ्या कसे

प्रिन्सेस डाएना यांनी १९८५ साली व्हाइट हाऊस स्टेट डिनरवेळी मिडनाइट ब्लू वेलवेट गाऊन परिधान केला होता. यावेळी त्यांनी अमेरिकन  अभिनेता जॉन ट्रावोल्टासोबत डान्सही केला होता. त्यांचे फोटो लोकप्रियही झाले होते.  मात्र लिलावामध्ये लोकांचं लक्ष वेधून घेण्यास हा ड्रेस अपयशी ठरला आहे. लंडनमध्ये फॅशन फॉर पॅशन अंतर्गत त्यांचा गाऊन लिलावासाठी ठेवण्यात आला होता. ज्याची किंमत जवळपास तीन कोटी इतकी ठेवण्यात आली होती. मात्र लिलावात अपेक्षेप्रमाणे हा ड्रेस विकला गेला नाही. पण लिलाव संपल्यानंतर कमी किमतीत म्हणजे जवळपास दोन कोटींच्या आसपास या ड्रेसचा अखेर लिलाव झाला, 

अ‍ॅपलसारखे Realme चेही Buds Air, किंमत लीक