निरोगी आयुष्यासाठी योग्य आहार हा नेहमीच आवश्यक असतो. आहारात योग्य पदार्थांचा समावेश केल्यानं शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतं. सकस आहारात असलेल्या पोषणमुल्यांमुळे शरीरास रोगापासून लढण्यास मदत मिळते. मात्र अयोग्य अहारशैली तुमच्या आरोग्यास घातक ठरते.
अयोग्य आहारशैलीतून कर्करोगाचा धोका अधिक असल्याचं अभ्यासक्रमातून समोर आलं आहे. Friedman School of Nutrition Science and Policy नं अमेरिकन लोकांच्या डाएटवर आधारित करण्यात आलेल्या दोन सर्व्हेचा आधार घेत हा निष्कर्ष काढला आहे. २०१५ साली कॅन्सरचं निदान झालेल्या किती रुग्णांच्या आहारात सकस अन्नाचा समावेश होता आणि किती अयोग्य आहाराचा समावेश होता यावरून ही माहिती घेण्यात आली. जगभरातील जवळपास ८० हजार कॅन्सर रुग्णांची आहारशैली ही अयोग्य असल्याचं यातून समोर आलं आहे. ही संख्या एकूण ५ % असल्याचं JNCI Cancer Spectrum मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात म्हटलं आहे.
लोकांनी आहारात नेहमीच सकस आहाराचा समावेश करावा आपली अयोग्य आहारपद्धती बदलावी असा आमचा प्रयत्न असणार असल्याचंही कर्करोग संशोधक फँग झँग म्हणाले.