पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Poco F1 : त्या अफवांबद्दल कंपनीचं स्पष्टीकरण

पोको एफ १

शाओमीनं गेल्याचवर्षी Poco F1 हा फोन लाँच केला. या फोनला भारतीय ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र या फोनचं उत्पादन थांबवलं असून विक्रीसाठी असलेले सारे फोन कंपनीनं परत मागवले आहेत अशा बातम्या पसरू लागल्या. मात्र त्या निव्वळ अफवा असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.  ज्या फोनमध्ये दोष आढळला आहे ते फोन चाचणीसाठी परत मागवले असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. 

बग्स आणि इतर काही तांत्रिक अडचणींमुळे काही युजर्सचे फोन परत मागवले आहेत. ग्राहकांना योग्य सुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. ज्यात काही दोष आढळले आहेत त्याचं निवारणं आणि चाचणीसाठी फोन मागवण्यात आले आहेत. ही एक नियमीत करण्यात आलेली चाचणी असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. 

काही पोको युजर्सनं टच स्क्रीन हाताळताना अडचण येत असल्याची तक्रार केली होती.  त्यानंतर बग असलेले युजर्सचे फोन परत मागवल्याची माहिती पोकोचे ग्लोबल हेड अल्विन टेस यांनी ट्विट दिली आहे.