पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रस्त्यात सापडलेलं पैशांचं पाकीट लोक खरंच परत करतात का?

पैशांचं पाकीट

रस्त्यात सापडलेलं पैशांचं पाकीट लोक खरंच परत करतात का? हे जाणून घेण्यासाठी एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनातून काढण्यात आलेला निकष हा आश्चर्याचा धक्का देणारा असाच होता. ७२ % लोक  त्यांना सापडलेलं पैशांचं पाकीट परत करतात  असं या संशोधनातून समोर आलं आहे. 

पैशांच्या पाकिटात जर रक्कम जास्त असेन तर बहुतेक लोक हे पाकीट परत करतात किंवा पाकीट मालकाचा शोध घेतात असं जर्नल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनात म्हटलं आहे. १३ संशोधक आणि ४० देशांतल्या ३५५ शहरांतील माहितीच्या आधारे हा निकष काढण्यात आला आहे. जवळपास १७ हजार पाकीट हरवल्याच्या घटनांचा अभ्यास करून हा निर्ष्कष मांडण्यात आला आहे.

सोनीनं लाँच केला फोनच्या आकाराचा एसी, कुठेही घेऊन फिरू शकता

 या संशोधनासाठी तीन वर्षे संशोधकांनी मेहनत घेतली आहे. रस्त्यात सापडलेलं पाकीट स्वत:जवळ ठेवणं ही चोरी असल्याचं अनेकजण मानतात याच भावनेतून पाकीट परत केलं जातं. अनेकांना पाकीट मालक पैशांचं पाकीट हरवल्यानं चिंतेत असेन हा विचार सतावत असतो, या दोन भावनेतून अनेक लोक पैशांचं पाकीट परत करण्याचा प्रयत्न करतात असा निकष यातून काढण्यात आला आहे.

इनकॉग्निटो मोडमध्येही काहीवेळा तुमचा माग काढणे शक्य, गुगलकडून लवकरच ब्राऊजरमध्ये सुधारणा

स्विर्त्झलँड, नॉर्वे, नेदरलँड, डेन्मार्क, स्वीडनसारख्या देशांत ७० ते ८५ लोक त्यांना सापडलेलं  पाकीट मालकाला परत  करतात. सापडलेलं पाकीट परत करणाऱ्या सर्वाधिक प्रामाणिक लोकांमध्ये स्विर्त्झलँडमधील लोकांचा समावेश आहे. तर चीन, पेरू, केनिया यांसारख्या देशांत सापडलेलं पाकीट परत करणाऱ्या व्यक्तीची संख्या ही  ८ ते २० % च्या घरात आहे.