पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Parsi New Year 2019 : खास पारसी रेसिपी 'चिकन फरचा'

चिकन फरचा

पारसी बांधव नवरोझ साजरा करत आहेत. पारसी नववर्षानिमित्तानं घरात अनेक पक्वान्न तयार केली जातात. यात 'पात्रा नी मच्छी', 'कटलेट', 'साली गोटी', 'चिकन फरचा' 'कस्टर्ड' यांसारख्या अनेक लज्जतदार पदार्थांचा समावेश असतो. पारसी  नववर्षानिमित्तानं अशीच एक प्रसिद्ध पारसी पाककृती आपण जाणून घेणार आहोत. द रिसॉर्ट मुंबईचे प्रमुख शेफ शेरियार धोतीवाला यांनी खास हिंदुस्थान टाइम्सच्या वाचकांसोबत ही पाककृती शेअर केली आहे. 

पावसाळ्यात या खिचडी ठरतील पोटासाठी फायदेशीर

चिकन फरचा 
साहित्य : बोनलेस चिकन, १ छोटा चमचा आलं पेस्ट, १ छोटा चमचा  लसूण पेस्ट,  दीड चमचा गरम मसाला, काळी मिरी पावडर स्वादानुसार, अर्धा चमचा धणे पूड, १ छोटा चमचा मिरची पावडर, दोन मोठे चमचे लिंबाचा रस, २ अंडी, तळण्यासाठी तेल आणि चवीनुसार मीठ, चार मोठे चमचे ब्रेड क्रम्स

Beauty Tips : नारळाचं दूध केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर

कृती : 
- चिकनच्या तुकड्यांना आलं- लसूण पेस्ट, मीठ, लिंबाचा रस, मिरची पावडर, गरम मसाला, धणे पावडर, मिरपूड लावून चांगलं मॅरिनेट करून घ्यावं. चिकन तासभर तरी चांगलं मॅरिनेट करून घ्यावं.
- एका मोठ्या भांड्यात अंडी फेटून घ्यावीत. अंड्यामध्ये चीवनुसार मीठ, मिरपूड आणि थोडीशी मिरची पावडर टाकावी.
- तेल चांगलं गरम करून घ्यावं. 
- मॅरिनेट केलेल्या चिकनच्या तुकड्यांना ब्रेड क्रम्स लावावे. त्यानंतर चिकनचे तुकडे अंड्याच्या मिश्रणात घोळवून तेलात डिप फ्राय करावे.