पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वनप्लसचा सदिच्छादूतच वापरतोय भलताच फोन

वनप्लस

वनप्लसनं काही महिन्यांपूर्वी त्यांचा बहुचर्चित असा वनप्लस ७ आणि वनप्लस ७ प्रो असे दोन फोन लाँच केले. या फोनच्या प्रसिद्धीसाठी लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाउनी जुनियरची सदिच्छादूत म्हणून निवड केली. मात्र वनप्लस ७ आणि वनप्लस ७ प्रो या दोन्ही फोनची सोशल मीडियावर जाहिरात ही रॉबर्टनं हुआवै फोनवरून केली असल्याचं समोर आलं आहे. 

सॅमसंग ‘Galaxy Fold’ या दिवशी होणार लाँच

चिनी सोशल मीडिया विबोवर वनप्लसचा सदिच्छादूत रॉबर्ट हा हुआवै फोनवरून  वनप्लसच्या फोन्सची जाहिरातबाजी करत असल्याचं हुआवै कंपनीनं निदर्शनास आणून दिलं. पण काही वेळातच विबोवरील पोस्टही डीलिटही करण्यात आली. या पोस्टचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

'आयफोन ७ प्लस'च्या जागी साबणाची वडी, १ लाखांची नुकसान भरपाई

यापूर्वी अनुष्का शर्मानं गुगल पिक्सेल फोनची जाहिरात ही आयफोनवरून केली होती. वंडर वुमन  गैल गैडोट हिनं देखील हुआवै फोनची जाहिरात आयफोनवरूनच केली होती. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:OnePlus ambassador posted on Weibo promoting the OnePlus 7 series with a Huawei P30 Pro phone