पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वनप्लस ७ टी प्रो येणार? फोटो लीक

वनप्लस ७ टी प्रो

वनप्लसनं काही महिन्यांपूर्वीच वनप्लस ७ आणि वनप्लस ७ प्रो हे दोन फोन्स लाँच केले. या फोन्सनां ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. आता कंपनी वनप्लस ७ टी प्रो देखील आणणार आहे. या फोनचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. 

सॅमसंग ‘Galaxy Fold’ या दिवशी होणार लाँच

कंपनीनं मे महिन्यात लाँच केलेल्या वनप्लस ७ प्रो पेक्षा ७ टी प्रो थोडा हटके असणार आहे. यासाठी डिझाइनमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. या फोनमध्ये notch-free edge-to-edge डिस्प्ले असणार आहे. वनप्लस ७ टी प्रोमध्येही पॉप अप सेल्फी कॅमेरा असणार आहे. त्याचप्रमाणे  वनप्लस ७ टी प्रो हा आकारानंही वनप्लस ७ प्रोपेक्षा मोठा असणार आहे.  

वनप्लसचा सदिच्छादूतच वापरतोय भलताच फोन

सुत्रांच्या माहितीनुसार विविध रंगांच्या वेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे. सध्या विक्रीसाठी असलेल्या वनप्लस ७ प्रोची किंमत ही ४८, ९९९ ते ५७, ९९९ रुपयांच्या दरम्यान आहे. आता वनप्लस ७ टी प्रो किंमत किती असणार हे पाहण्यासारखं ठरणार आहे.