पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

OnePlus 7T चा पहिला लूक प्रदर्शित

वनप्लस ७ टी

वनप्लसनं मे महिन्यात आपला वनप्लस ७ आणि वनप्लस प्रो हे दोन फोन लाँच केले. हे फोन लाँच करून सहा महिने उलटत नाही तोच कंपनी आता OnePlus 7T हा ना फोन लाँच करणार आहे. बहुचर्चित अशा वनप्लस ७ टीचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 

नव्या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा लेन्स असणार आहे. वनप्लसच्या आतापर्यंत लाँच झालेल्या फोन्सच्या तुलनेत वनप्लस ७ टीचं कॅमेरा मॉड्यूल हे सर्वाधिक हटके आहे. कॅमेरामध्ये एलइडी फ्लॅशही देण्यात आला आहे. 

या कंपनीच्या मोबाइलची होते सर्वाधिक ऑनलाइन विक्री

या फोनमध्ये मॅट फिनिशिंग असलेलं ग्लास डिझाइन असणार आहे. फोनची बाह्य डिझाइन ही जुन्या फोन्सशी मिळतीजुळती आहे. ६.५५ इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले या फोनमध्ये असणार आहे. या फोनमध्येही ४८ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात येणार आहे. 

हा  फोन भारतात २६ सप्टेंबरला लाँच होणार आहे, तर वनप्लस ७ टी प्रो फोन ऑक्टोबर महिन्यात लाँच करण्याच्या विचारात कंपनी आहे.

आयफोन ११ सीरिज लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत एका क्लिकवर