पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

OnePlus 7T आणि OnePlus TV भारतात लॉन्च; किमती आणि फीचर्स जाणून घ्या

वनप्लस टी7

OnePlus कंपनीचा बहुप्रतीक्षित OnePlus 7T स्मार्टफोन आणि OnePlus TV भारातामध्ये लॉन्च झाला आहे. जून महिन्यामध्ये कंपनीने OnePlus 7 स्मार्टफोन लॉन्च केला होता. त्यानंतर OnePlus 7T स्मार्टफोन काही अपग्रेडसोबत कंपनीने लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत ३७ हजार ९९९ असणार आहे. तर OnePlus TVची किंमत ६९ हजार ९९० असणार आहे. या स्मार्टफोनची विक्री २८ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन OnePlus कंपनीच्या साईटवर, अ‍ॅमेझॉनवर आणि OnePlusच्या स्टोरमध्ये उपलब्ध होणार आहे. 

ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय मी तहकूब केला : शरद पवार

OnePlus 7T स्मार्टफोनमध्ये तीन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर दुसरा कॅमेरा १२ आणि १६ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला ६.५५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. स्नॅपड्रॅगन ८५५+ सोबत ९०एचझेड स्क्रीन देण्यात आली आहे. क्वालक्वाम स्नॅपड्रॅगन ८५५ देण्यात आले आहे. तर या स्मार्टफोनमध्ये फ्रिंगरप्रिंट आणि ३ हजार ८०० एमएएच क्षमेतेची बॅटरी देण्यात आली आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ स्टोरेजचा OnePlus 7T स्मार्टफोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम २५६ स्टोरेजच्या फोनची किंमत ३९ हजार ९९९ रुपये इतकी आहे.

उत्तरे द्यायला नाही प्रश्न विचारायला चाललोय : राष्ट्रवादी
 
दरम्यान, OnePlus TVचे फिचर्स सांगायचे झाले तर, या टीव्हीमध्ये Android TV बेस्ड कस्टम ऑपरेटिंग सिस्टम आहे. ५५ इंच वेरियंटमध्ये हा टीव्ही लाँच करण्यात आला आहे. हाय-एण्ड वेरियंट ४के एचडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये ८ इनबिल्ड स्पिकर देण्यात आला आहे. तसंच या टीव्हीमध्ये गूगल प्ले स्टोर वापरता येणार आहे. Dolby Atmos आणि Dolby Vision चे सपोर्ट या टीव्हीला लावता येणार आहेत. 

NASA ने जारी कली Chandrayaan-2 संदर्भातील छायाचित्रे