पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुढील महिन्यात OnePlus 7T, OnePlus 7T Pro भारतात होणार लाँच

OnePlus 7T

वनप्लसनं OnePlus 7 लाँच करून तीन महिने उलटले आहेत. आता कंपनी पुढील महिन्यात  OnePlus 7T, OnePlus 7T Pro हे दोन स्मार्ट फोन लाँच करणार आहे. त्याचबरोबर  कंपनी OnePlus TV देखील लाँच करणार आहे. २६ सप्टेंबरला हे दोन फोन लाँच होणार आहेत.

सॅमसंगचा Galaxy A10s भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

कंपनीनं अद्यापही OnePlus 7T, OnePlus 7T Pro च्या लाँचिग संदर्भात घोषणा केली नाही मात्र भारतात हे दोन्ही फोन सप्टेंबरमध्ये लाँच होणार असल्याचं म्हटलं जात आहे. OnePlus 7T हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. ८ जीबी + १२८ जीबी आणि ८ जीबी + २५६ जीबी अशा दोन व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले असणार आहे. 

अँड्राईडसाठी व्हॉट्स अ‍ॅप आणणार हे नवे फीचर्स

या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे. ज्यात ४८ मेगापिक्सेल, १६ मेगापिक्सेल आणि १२ मेगापिक्सेल असा कॅमेरा सेटअप असणार आहे. मात्र OnePlus 7T Pro कसा असणार आहे हे गुलदस्त्यात आहे.