पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'वनप्लस ७' आणि 'वनप्लस ७ प्रो'चे फीचर लीक

OnePlus 7 vs OnePlus 7 Pro

वनप्लसच्या 'वनप्लस ६' आणि 'वनप्लस ६T ' ला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद लाभला. गेल्या आठवड्यात कंपनीनं  वनप्लस ७ आणि वनप्लस ७ प्रोची घोषणा केली. हे दोन्ही फोन येत्या १४ मेला भारतात लाँच केले जात आहेत. हा फोन कसा असेल याची उत्सुकता ग्राहकांना आहे. लाँचिंग आधी या  फोनचे काही फीचर्स लीक झाले आहेत.

वनप्लस ७ 
Androidpure नं वनप्लस ७ चे काही फीचर्स पोस्ट केले आहेत. या फोनमध्ये ६.२ इंचाचा अॅमोलेड एचडी डिस्प्ले  असणार आहे. 
 या फोनचा रॅम ६ जीबी असेल तर या फोनमध्ये ४८ मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि टेलीफोटो सेन्सॉर असणार आहे.  टाईप सी चार्जर फोनसोबत उपलब्ध असणार आहे. तसेच फिंगरप्रिंट सेन्सॉर फोनमध्ये असेन. 

वनप्लस ७ प्रो
 वनप्लस ७ प्रोची स्क्रीन ही वनप्लस ७ पेक्षा थोडी मोठी असणार  आहे. या फोनचा डिस्प्ले ६.६४ इंचाचा असणार आहे. तर या फोनमध्ये १० जीबी रॅम असणार आहे. फोनमध्ये ट्रीपल रिअर कॅमेरा सेटअप असणार ज्यात ४८ मेगापिक्सेल कॅमेरा, टेलीफोटो आणि वाइड अँगल सेन्सॉर देखील असतील. 

यापूर्वी वनप्लस ५, वनप्लस ६ आणि वनप्लस ६ प्लस ला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे ग्राहक 'वन प्लस ७ ' च्या प्रतिक्षेत आहेत. हा फोन अॅपलनं लाँच केलेल्या iPhone XR ला टक्कर देणार ठरू शकतो. या फोनची किंमत ही ५२ ते ५७ हजारांच्या घरात असल्याचं म्हटलं जात आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:OnePlus 7 vs OnePlus 7 Pro Leaked specifications reveal difference between the two phones