पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या दिवशी 'वनप्लस ७' होणार लाँच

वनप्लस

अनेक दिवसांपासून ग्राहक वनप्लस 7 च्या प्रतिक्षेत होते. हा फोन मे महिन्यांत भारतात लाँच होणार अशा चर्चा होत्या.  अखेर वनप्लसनं 'वनप्लस ७ ' आणि 'वनप्लस प्रो' या दोन स्मार्टफोनच्या लाँचिंगची अधिकृत घोषणा केली. हे फोन  १४ मे रोजी भारतात लाँच होणार आहेत. 

पण त्याआधीच वनप्लस ७ प्रोचे काही फीचर्स हे लीक झाले आहेत. या फोनमध्ये १२ जीबी रॅम,  २५६ जीबी बिल्ट इन स्टोअरेज असणार आहे. १२ जीबी क्षमता असलेल्या फोनची किंमच ही जवळपास ५७ हजार असल्याचं म्हटलं जात आहे.  तर ६ जीबी रॅम असलेला दुसरा मॉडेलही १४ मे रोजी लाँच करण्यात येणार आहे. याची किंमत जळपास ५२ हजार  असल्याचं म्हटलं जात आहे. वनप्लस ७ प्रोचं ५ जी व्हर्जनही ही येणार असल्याची माहिती कंपनीने सीईओ पीट लाऊ यांनी दिली. भविष्यातील स्मार्टफोनवरील पडदा आम्ही हटवणार आहोत. या स्मार्टफोनमध्ये टॉप क्लास टेक्नोलॉजीचा समावेश असणार आहे, असंही लाऊ यांनी सांगितलं. 

वनप्लस ७ मध्ये ९० एचडी डिस्प्ले असू शकतो, अशी माहितीही समोर येत आहे. OnePlus ७ मध्ये ५ जी सपोर्ट देणारा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ एसओसीसह लाँच केला जाणार असल्याची चर्चा आहे. हा प्रोसेसर गेल्या वर्षीच्या मोबाईल काँग्रेसमध्ये लाँच झाला होता.  यापूर्वी वनप्लस ५, वनप्लस ६ आणि वनप्लस ६ प्लस ला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे ग्राहक 'वन प्लस ७ ' च्या प्रतिक्षेत आहेत. हा फोन अॅपलनं लाँच केलेल्या iPhone XR ला टक्कर देणार ठरू शकतो.