पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

OnePlus 7 आजपासून विक्रीसाठी उपलब्ध, किंमत...

वनप्लस ७

बहुप्रतिक्षीत असा वनप्लस ७ आजपासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.  विविध ई कॉमर्स साइट्वर हा फोन  दुपारी १२ वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. अॅमेझॉन इंडियाच्या प्राइम मेंबर्सना या फोनवर सवलत मिळत आहे. एसबीआयच्या ग्राहकांना २ हजार रुपयांचा डिस्काऊंट या  फोनवर मिळत आहे. हा फोन  कंपनीच्या ऑनलाइन साइट आणि काही ठराविक स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर १४ जूनपासून हा फोन सर्वत्र  विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 

Xiaomi Redmi K20 आणि K20 Pro यादिवशी होणार भारतात लाँच

स्वस्तात मस्त! १५ हजारात उपलब्ध होणारे स्मार्टफोन

किंमत 
वनप्लस ७ दोन रंगात उपलब्ध होणार आहे. मिरर ग्रे आणि रेड अशा दोन रंगात हा फोन येणार आहे. 
६GB+१२८GB व्हेरिएंटची किंमत : ३२ हजार ९९९ रुपये 
८GB+२५६GB व्हेरिएंटची किंमत : ३७ हजार ९९९ रुपये 

फीचर्स 
- ६.४१ इंचाचा अॅमोलेड  डिस्प्ले
- ८५५ स्नॅपड्रॅगन क्वॉलकॉम  प्रोसेसर
- ४८ आणि ५ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- १६ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा
- ३,७००mAh बॅटरी