पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

OnePlus 7 Pro, OnePlus 7 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

वनप्लस ७

 गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले OnePlus7 आणि OnePlus7 Pro हे दोन  स्मार्टफोन अखेर १४ मे रोजी लाँच करण्यात आले. वनप्लसच्या सर्वच फोननां भारतीय ग्राहकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. तेव्हा वनप्लसच्या चाहत्यांना  या दोन  फोनची खुपच आतुरता होती. एका इव्हेंटमध्ये भारतासह अमेरिका आणि युरोपात एकाच वेळी हे फोन लाँच करण्यात आले. या फोनच्या किंमती आणि फीचर्स जाणून घेऊ.

OnePlus 7 Pro
वन प्लसनं आतापर्यंत बाजारात आणलेल्या सर्वात महागड्या फोनपैकी एक म्हणजेच वनप्लस ७ प्रो होय. ६GB, ८GB आणि १२GB रॅम अशा  तीन व्हेरिएंटमध्ये हा फोन लाँच  करण्यात आला आहे.  OnePlus 6T पेक्षा याचा डिस्प्ले मोठा आहे. ६.४१ इंचाचा डिस्प्ले यात देण्यात आला आहे. OnePlus 6T पेक्षा  वनप्लस ७ प्रो हा वेगानं  चार्ज  होणारा आहे. या फोनमध्ये fingerprint sensor ही असणार आहे. यात ४८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असून त्याला ८ व १६ मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यांची जोड आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी १६ मेगापिक्सेल  सेल्फी पॉपअप कॅमेराही असणार  आहे. १७ मे पासून  हा  फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
किंमत 
 ६GB व्हेरिएंट - ४८,९९९ रुपये
८GB व्हेरिएंट - ५२,९९९ रुपये
१२GB व्हेरिएंट - ५७, ९९९ रुपये 

OnePlus 7
OnePlus 7 हा  फोन काहीसा OnePlus 6T च्या  जवळ जाणारा आहे. यातही  ६.४१ इंचाचा डिस्प्ले आणि  in-screen fingerprint sensor देण्यात आला आहे. ६GB आणि ८GB अशा दोन व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध करून देण्यात आला आहे. ४८ मेगापिक्सेल कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा या फोनमध्ये आहे. 
किंमत 
 ६GB व्हेरिएंट - ३२,९९९ रुपये
८GB व्हेरिएंट - ३७, ९९९ रुपये