पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑफिस बॅगचं वजन नेमकं हवं तरी किती?

जड ऑफिस बॅग दुखापतीसाठी कारणीभूत

ऑफिसला जाणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांच्या पाठ, खांदा, मान दुखीचं कारण असतं ऑफिसची जड बॅग. ऑफिसमध्ये बराच काळ बसून असल्यानं पाठ, मानदुखीचे अनेक आजार बळावतात, मात्र जड ऑफिसबॅगही या दुखापतींसाठी कारणीभूत असते. 

तुम्ही दररोज ऑफिसला घेऊन जाणाऱ्या बॅगेचं वजन हे तुमच्या वजनाच्या ५ ते ७ टक्क्यांपेक्षा अधिक नसावं, अशी माहिती  फोर्टिस संशोधन केंद्राच्या  फिजिओथेरेपी विभागाचे प्रमुख डॉक्टर बाल मुकूंद यांनी दिली. एका खांद्यावर अधिक वजनाची बॅग घेऊन जास्तवेळ प्रवास केल्यानं खांदा, मान दुखीचे आजार बळावतात असंही डॉक्टरांनी सांगितलं. 

३९ व्या वर्षीही करिनाच्या सुंदरतेचे आणि फिटनेसचे 'हे' आहे रहस्य

टोट बॅग्स
टोट बॅगेत अनेक वस्तू अगदी सहज मावतात त्यामुळे अनेकांची पसंती टोट बॅग्सना असते.  मात्र वजनानं भरलेल्या या बॅगेमुळे खांदा एका बाजूला सतत झुकतो. त्यामुळे खांदा किंवा मान दुखीचे त्रास उद्भवतात, म्हणूनच टोट बॅग घेणं टाळा. 

टॉप हँडल बॅग्स 
महिलांमध्ये सध्या टॉप हँडल बॅग्सची फॅशन आहे. एका हातात या अडकवल्या जातात. मात्र अशाप्रकारे बॅग एका हातात अडकवून चालणं हे हाताच्या दुखण्याला आयतं निमंत्रण देण्याची शक्यता आहे. त्यामुळे वजन जास्त असल्यास एका हातात या बॅग्स कॅरी करु नये असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

क्रॉस बॅग्स 
क्रॉस बॅग्समुळे काहीप्रमाणात दुखणं कमी होतं. मात्र क्रॉस बॅग घेतल्यानंतर त्यातील सामान ठेवण्यात येणारा भाग हा कंबरेच्या उंचीएवढा वर घ्यावा. यामुळे वजनाचं संतुलन काहीप्रमाणात योग्य ठेवलं जातं. 

Nokia 7.2 : ४८ मेगापिक्सेल कॅमेरा आणि बरंच काही

बॅकपॅक 
 तुम्ही तुमच्या वजनाच्या ५% हून अधिक वजनानं भरलेली बॅग ऑफिसमध्ये नेत असाल तर बॅकपॅक हा उत्तम पर्याय आहे. जास्त वजनासाठी बॅगपॅक वापराव्यात. शक्यतो वेस्टबँड असलेल्या बॅकपॅक  निवडाव्या यामुळे वजनाचं संतुलन राखण्यास मदत होते.