पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कॉफीपासून तयार करणार सनग्लासेस

कॉफीपासून सनग्लासेस

युक्रेनमधला आयवेअर ब्रँड ओचिस हा लवकरच कॉफीपासून सनग्लासेस तयार करणार आहे. ट्रेंडी सनग्लासेस तयार करण्यासाठी  ही कंपनी ओळखली जाते मात्र आता पर्यावरणपूरक असे सनग्लासेस तयार करण्याकडे कंपनीचा भर असणार आहे.सध्या कॉफीपासून सनग्लासेस तयार करण्याचा कंपनीचा प्रयत्न सुरू आहे. हे सनग्लासेस फॅशनेबल असावेत पण त्याचबरोबर ते इकोफ्रेंडली असावेत हा कंपनीचा प्रयत्न असणार आहे. 

ब्रेकअप- पॅचअप अन् पुन्हा ब्रेकअपचा खेळ ठरू शकतो घातक

यापूर्वी ओचिसनं पुदीना, पासर्ली, वेलचीपासून सनग्लासेसची फ्रेम तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आलं नाही. कॉफीच्या टाकाऊ पदार्थांचा वापर फर्निचर, कप, प्रिंटिंग इंक, इंधन तयार करण्यासाठी केला जातो. आता याचाच वापर करून सनग्लासेसची फ्रेम तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला. या सनग्लासेसनां  कॉफीचा सुगंधही येणार आहे असंही ओचिसचे सीईओ म्हणाले.

हा आहे दिशाचा 'फिटनेस मंत्र'

कॉफीचा रंग काळा असतो. सनग्लासेसमध्ये काळ्या रंगाच्या फ्रेम्सनां जास्त प्राधान्य असते कारण ते कोणत्याही रंगावर साजेसे दिसतात अशी माहिती त्यांनी दिली. कॉफीचं पीक हे जगात अनेक ठिकाणी घेतलं जातं. त्यामुळे लागणारे टाकाऊ घटक हे सहज उपलब्ध होतील असंही त्यांनी सांगितले. हे  सनग्लासेस फेकून दिले तरी त्यापासून खत तयार करता येणार आहे. या सनग्लासेसची किंमत ५ हजारांपासून सुरू आहे असं कंपनीनं सांगितलं.