पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी गरज पोषक आहाराची

मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी गरज पोषक आहाराची (संग्रहित छायाचित्र)

सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीचा आठवडा हा 'पोषक आहार आठवडा' (Nutrition week) म्हणून साजरा केला जातो. १९८२ पासून हा आठवडा साजरा करण्यात आला. यानिमित्ताने या क्षेत्रातील तज्ज्ञ पुण्यातील 'जस्ट फॉर हार्ट्स'च्या दिव्या सांगलीकर यांनी काही टिप्स दिल्या आहेत. 

आजच्या या धकाधकीच्या जीवनात मुलांच्या आहाराकडे थोड्याफार प्रमाणात दुर्लक्ष होते. असे कोणी मुद्दाम करत नाही पण ऑफिसच्या कामामुळे, कामातील ताणतणावपूर्ण वातावरणामुळे असे होणे स्वाभाविक आहे. सकाळी घर सोडलेले पालक जर रात्री उशिरा येत असतील तर यामध्ये ते तरी काय करतील. पण अशा वेळी घरातील दुसऱ्या व्यक्तीने म्हणजे वडील, आजी, आजोबा, काका, काकू, मावशी यांनी या जबाबदाऱ्या सांभाळून घेतल्या पाहिजेत.

दीर्घायुष्य हवंय? मग शीतपेय पिणे थांबवाच

आपल्या मुलांना वेगवेगळ्या भाज्याबद्दल माहिती घडवून देणे त्या बद्दलचे महत्त्व समजावून सांगणे. आठवड्यातून एकदा मुलांना भाजी मार्केटमध्ये घेऊन जाऊन त्यांच्या आवडीच्या भाज्या विकत घेणे. त्या त्यांना निवडण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी देणे. या अशा छोट्या छोट्या जबाबदाऱ्या देऊन वेगवेगळ्या प्रकारातून मुलांना भाज्यांचे महत्व समजावून सांगता येते. 

नेहमी कोशिंबीर बनवावी पण त्या कोशिंबीरमध्ये मुलांच्या ना आवडीच्या भाज्या म्हणजे दुधी भोपळा किंवा त्या प्रकारच्या भाज्या गूपचूप थोड्याप्रमाणात टाकाव्यात, बटाटा आणि डाळिंब एकत्र करून त्याचे सलाड द्यावे, बिटपासून पराठे बनवावे, वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे बनवणे, गव्हाच्या आणि रव्याच्या शेवयाची खीर बनवावी तसेच पुलावही बनवावा. दुधाचे कोणतेही पदार्थ द्यावे, कारण दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅलशियम असते. ते शरीराच्या बऱ्याच उणिवा भरून काढते. 

ब्रेकअप- पॅचअप अन् पुन्हा ब्रेकअपचा खेळ ठरू शकतो घातक

मुलांच्या एकाच प्रकारच्या सवयी बदलणे म्हणजे एकाच प्रकारची भाजी, एकाच प्रकारचे फळ खात असेल तर हळूहळू त्यामध्ये बदल घडवावेत. चपाती-भाजी, दुग्धजन्य पदार्थ देऊ शकतो. स्नॅक्सचे प्रमाण कमी करणे तसेच बेकरी पदार्थ पण कमी प्रमाणात द्यावे, जंकफूडचा वापर खूप कमी प्रमाणात करावा. अशा एक ना अनेक प्रकारच्या युक्त्या वापरून आपण मुलांच्या चांगल्या पोषणासाठी सिंहाचा वाटा उचलू शकतो. शेवटी आपणच आपल्या मुलांची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो.